मुंबई : सर्वाधिक लोकप्रिय इंजिन असलेल्या गुगल सर्च इंजिनमध्ये तांत्रिक अडचण आल्याने गुगलशी संबधीत सर्व सेवांवर परिणाम झाला होता. जीमेल, युट्यूब, गुगल हँगआऊट, गुगल प्ले स्टोअर सेवा सुरु करण्यात अडचण येत होत्या. मात्र डाऊन झालेली गूगलसेवा 45 मिनीटानंतर पूर्ववत सुरू झाली आहे. अद्याप सेवा ठप्प होण्याचे कारण गूगलकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र या सेवा पूर्ववत झाल्या आहेत अशी माहिती गूगलने दिलीआली आहे. तसेच गूगलने सर्व युजर्सचे आभारही मानले आहेत.


We’re all clear folks! Thanks for staying with us.

— Google Workspace (@GoogleWorkspace) December 14, 2020

गूगलचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे गूगल जगभरात काम करेनासे झाले होते. सुमारे पाऊण तास गूगलसेवा ठप्प होती. सोमवारी सायंकाळी 5.30 नंतर अडथळा येऊ लागला. त्यानंतर रिफ्रेश करूनही माहिती अपडेट होत नसल्याचं दिसून आलं. युजर्सकडून डाऊन झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.


कोणकोणत्या सेवा होत्या ठप्प?




  • जीमेल

  • गूगल कँलेंडर

  • गूगल डॉक्स

  • गूगल शीट्स

  • गूगल स्लाइड्स

  • गूगल साइट्स

  • गूगल ग्रुप्स

  • क्लासिक हँगआऊट

  • गूगल चॅट

  • गूगल मीट

  • गूगल वॉल्ट

  • करन्ट्स

  • गूगल फॉर्मस

  • गूगल क्लाऊड सर्च

  • गूगल कीप

  • गूगल टास्क

  • गूगल व्हॉईस

  • गूगल अॅनालिटीक्स

  • अॅप मेकर

  • गूगल मॅप्स

  • गूगल सिन्क फॉर मोबाईल

  • क्लासरूम


सेवा ठप्प होण्याचे कारण गूगलकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. भारतात युट्यूब, जीमेल युजर्सची संख्या मोठी असल्याने भारतातील युजरवर सेवा ठप्प झाल्याचा मोठा परिणाम झाला आहे.