भाजप | सपा/ काँग्रेसअखिलेश/राहुल | बसपा (मायावती) | अपक्ष/इतर | एकूण |
164 ते 176 | 156 ते 169 | 60 ते 72 | 2 ते 6 | 403 |
.. तर मायावतींशी हातमिळवणी करु : अखिलेश यादव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Mar 2017 08:39 PM (IST)
NEXT
PREV
लखनऊ : उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचीच सत्ता येणार, मात्र संपूर्ण बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती राजवटीपेक्षा मायावतींशी हातमिळवणी करु, असं मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विधानसभा निवडणुकीतील सर्व शक्यतांना उत्तरं दिली. नुकत्याच झालेल्या यूपी विधानसभेचा निकाल 11 मार्चला जाहीर होणार आहे.
कुणाचीही इच्छा नसेल की यूपीत राष्ट्रपती राजवट यावी आणि भाजपच्या हातात यूपीचा रिमोट जावा, असं सांगत त्यांनी यूपीमध्ये त्यांचीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला. यूपीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती राजवटीऐवजी बसपाशी युती करु, असे संकेतही अखिलेश यादव यांनी दिले आहेत. त्यामुळे राजकारणातील कट्टर शत्रु समजले जाणारे अखिलेश यादव आणि मायावती सत्तेसाठी एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुलायम सिंहांबद्दलच्या प्रश्नावर अखिलेश यादव म्हणाले की, नेताजींना जिथे प्रचार करायचा होता, तिथे त्यांनी केला. आम्ही त्यांना याबद्दल काही सांगितलं नाही.
काँग्रेस-सपाच्या युतीवर काय म्हणाले अखिलेश यादव?
"राहुल गांधींचीही इच्छा आहे की, यूपीचा विकास व्हावा. मी राहुल गांधींना पूर्वीपासून ओळखतो. आम्हाला यूपीमध्ये धर्मनिरपेक्ष सरकार हवं आहे, त्यासाठीच आम्ही काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. मी कंजूस लोकांशी मैत्री करत नाही," असं अखिलेश यादवांनी म्हटलं आहे.
पोलीस आणि सरकारला तरुणांच्या बाबतीत खूप सतर्क राहावं लागेल, असं अखिलेश यादव यांनी सैफुल्लाहच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं आहे.
एबीपी माझा आणि सीएसडीएसने मतदानोत्तर चाचणी अर्थात एक्झिट पोल घेऊन चारही राज्यातील जनतेची मतं जाणून घेतली आहेत. यात यूपीमध्ये भाजप आणि समाजवादी पार्टी यांच्यात कांटे की टक्कर आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यूपीत कोणत्या पक्षाला किती जागांचा अंदाज – एकूण जागा 403
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -