बंगळुरु : भारतातील सर्वात लांब पूल अशी ओळख असलेला 'बोगीबील पूल' अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमावर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देवेगौडा म्हणाले की, "मी या पुलाचे भूमिपूजन केले होते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला बोलावले नाही."

देवेगौडा म्हणाले की, "मी पंतप्रधान असताना 1997 मध्ये काश्मीरसाठी रेल्वे मार्ग या योजना सुचवल्या होत्या. मीच बोगीबील पुलाला हिरवा कंदील दाखवला होता. परंतु देशातल्या या ऐतिहासिक प्रकल्पाची मी सुरुवात करुनही त्याच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मलाच डावलले.

अय्यो रामा, मुजे याद कौन करेगा?
बंगळुरुमध्ये एच. डी. देवेगौडा पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा पत्रकारांनी त्यांना बोगीबील पुलाबाद विचारले. यावेळी देवेगौडा म्हणाले की, "अय्यो रामा मुझे याद कौन करेगा?" या पुलाचे भूमिपूजन मी केले, परंतु पंतप्रधान मोदी मला विसरले. आज पुलाबाबतच्या बातम्यांमध्ये काही वर्तमानपत्रांनी माझ्या नावाचा उल्लेख केला आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे मला निमंत्रण पाठवले नाही.




संबधित बातम्या : 

देशातल्या सर्वात लांब बोगीबील ब्रिजचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन | दिब्रुगड, आसाम | एबीपी माझा

ब्रम्हपुत्रेच्या काठावर आशियातील सर्वात मोठा पूल