Air India-Boeing Deal:  एअर इंडियाने (Air India)  एकूण 470 विमाने खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यात फ्रान्सच्या एअरबसकडून 250 विमाने खरेदीचा एअर इंडियाचा व्यवहार आहे.  तर अमेरिकेच्या बोईंगकडून 220 विमाने खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, एअर इंडिया (Air India) आणि बोईंग कराराचं अमेरिकेचे अध्यक्ष बायडन (US President Joe Biden) यांच्याकडून स्वागत करण्यात आले असून या निर्णयाला ऐतिहसिक निर्णय असल्याचे म्हटले आहे.  एअर इंडियाने  85 अब्ज डॉलरचा करार केला आहे.  यातून एअर इंडियाला नवी उभारी देण्याचा टाटा सन्सचा प्रयत्न आहे, अशी माहिती टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन (Tata Sons Chairman N. Chandrasekaran) यांनी दिली आहे.


जो बायडन म्हणाले की, एअर इंडिया आणि बोईंग यांच्यामध्ये झालेल्या ऐतिहासिक कराराची घोषणा करताना मला आनंद होत आहे. ऐतिहासिक कराराच्या माध्यमातून 200 पेक्षा अधिक विमाने खरेदी करण्यात येणार आहे. या करारामुळे 44 राज्यात दहा लाखापेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार आहे.  या नोकऱ्यांसाठी  महाविद्यालयीन पदवीची आवश्यकता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी  आम्ही उत्सुक आहोत.


अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून निर्णयाचे स्वागत


करारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून राष्ट्रपती बायडन (US President Biden) यांच्याशी संवाद साधला. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कराराच्या माध्यमातून भारत-अमेरिका संबंध दृढ झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. दोन्ही नेत्यांनी एअर इंडिया आणि बोईंग यांच्यातील ऐतिहासिक कराराचे स्वागत केले, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास मदत होईल. पंतप्रधानांनी बोईंग आणि इतर अमेरिकन कंपन्यांना भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राच्या विस्तारामुळे निर्माण झालेल्या संधींचा वापर करण्यासाठी आमंत्रित केले आहे.  


एअर इंडियानने  फ्रान्सच्या एअरबसकडून 250 विमाने खरेदीची घोषणा मंगळवारी केली आहे.  टाटा सन्स एअरबसकडून 250 विमानं खरेदी करणार आहे. यामध्ये एअर इंडिया 40 A350 विमानं आणि 210 मध्यम श्रेणीतील विमानं खरेदी करणार. ज्यात 140 A320 आणि 70 A321 विमानं असणार आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले, "एअर इंडियाने एअरबसकडून 250 विमाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी 40 वाइड बॉडी विमाने असतील. टाटा समूहाच्या मालकीखाली आल्यानंतर एअर इंडियाची ही पहिली ऑर्डर असेल." 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


एअर इंडियाला मिळणार नवी उभारी, टाटा सन्स 250 विमाने करणार खरेदी; पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन