Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. यामध्ये मोठी जीवितहानी झाल्याची माहिती मिळत आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. यावेळी हे विमान कोसळले, यामध्ये 242 प्रवाशी होते. दरम्यान, जगातील पहिला विमान अपघात कधी आणि कसा झाला? याबाबत तुम्हाला काही माहित आहे का? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
अहमदाबादमध्ये आज एक भयानक विमान अपघात झाला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने लोकांचे प्राण गेले आहेत अशी भीती व्यक्त केली जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की जगातील पहिला विमान अपघात कधी झाला? विमानांच्या इतिहासातील पहिल्या अपघात हा 17 सप्टेंबर 1908 साली झाला होता. हा विमान अपघात अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात झाला होता. जिथे हजारो लोक फोर्ट मायर ग्राउंडवर जमले होते. सर्वांच्या नजरा आकाशाकडे होत्या कारण आज माणसाच्या पहिल्या उड्डाणाचा चमत्कार पुन्हा घडणार होता. प्रसिद्ध राईट ब्रदर्स - ऑरव्हिल आणि विल्बर राईट यांनी जगातील पहिले विमान बनवले होते, ज्याचे नाव "राईट फ्लायर" होते. आज तोच फ्लायर पुन्हा एकदा उडणार होता, पण यावेळी स्वतः अमेरिकन आर्मीचे अधिकारीही ते पाहण्यासाठी आले होते.
लष्कराला फ्लाइट डेमो दाखवताना घडला अपघात
राईट ब्रदर्स सैन्यासमोर या विमानाची चाचणी घेऊ इच्छित होते. त्या दिवशी ऑरव्हिल राईट स्वतः हे विमान उड्डाण करत होते आणि त्यांच्यासोबत प्रवासी म्हणून अमेरिकन आर्मी लेफ्टनंट थॉमस सेल्फ्रीज होते. विमानाने उड्डाण घेताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. काही क्षणांसाठी ते इतिहासातील सर्वात मोठे चमत्कार वाटला. पण आनंदाचे हे क्षण जास्त काळ टिकू शकले नाहीत. उड्डाणादरम्यान अचानक विमानाच्या एका प्रोपेलरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्याचे एक ब्लेड तुटले आणि खाली पडले आणि विमानाचे संतुलन बिघडले. काही सेकंदातच आकाशात उडणारे हे विमान वेगाने खाली पडले आणि जमिनीवर आदळले.
या अपघातात लेफ्टनंट थॉमस सेल्फ्रीज यांचा जागीच मृत्यू
या अपघातात लेफ्टनंट थॉमस सेल्फ्रीज यांचा जागीच मृत्यू झाला. विमान अपघातात जीव गमावणारा तो पहिला व्यक्ती ठरला. त्याच वेळी ऑरव्हिल राईट गंभीर जखमी झाला. त्याचे पाय तुटले आणि अनेक हाडे फ्रॅक्चर झाली. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले जिथे उपचारानंतर तो कसा तरी वाचला.
महत्वाच्या बातम्या: