Air India Plane Crash Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताने (Air India Plane Crash Ahmedabad) संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले होते. यामध्ये एकूण 265 जणांचा मृत्यू झााला आहे. यामध्ये विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. या भयानक अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत, ओळख पटवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डीएनए चाचणी. डीएनए चाचणी कशी केली जाते याबाबत तुम्हाला माहिती आहे का? अहमदाबाद विमान अपघातात जळालेल्या मृतदेहांचा कोणता भाग डीएनए चाचणीसाठी मदत करेल? याबाबतची माहिती पाहुयात.
डीएनए चाचणी म्हणजे काय?
डीएनए म्हणजेच डीऑक्सीरायबोन्यूक्लिक अॅसिड चाचणी. ही एक वैज्ञानिक तंत्र आहे जे एखाद्या व्यक्तीची अनुवांशिक रचना तपासून ओळखते. जगातील प्रत्येक व्यक्तीचा डीएनए वेगळा असतो. तो पेशींच्या केंद्रकात आढळतो. मृतदेह ओळखणे खूप कठीण असतानाही तंत्र विशेषतः उपयुक्त ठरते. अहमदाबाद विमान अपघातात, मृतदेह गंभीरपणे जळाले आहेत. ज्यामुळं डीएनए चाचणी ही ओळख पटवण्याचे मुख्य साधन आहे.
डीएनए चाचणी कशी केली जाते?
डीएनए चाचणी ही एक कठीण पण पद्धतशीर प्रक्रिया आहे. यामध्ये, अनेक टप्प्यांत तपास केला जातो.
नमुना संकलन:
सर्वप्रथम, डीएनए चाचणीसाठी नमुने घेतले जातात. अहमदाबाद विमान अपघातानंतर, गुजरात सरकारने बीजे मेडिकल कॉलेजमध्ये डीएनए नमुने ठेवण्याची व्यवस्था केली आहे. मृतांच्या शरीरातून हाडे, दात किंवा ऊतींचे नमुने घेतले जातील. हे त्यांच्या नातेवाईकांच्या जसे की पालक, मुले किंवा भावंडांच्या रक्त किंवा लाळेच्या नमुन्यांशी जुळवले जातील.
मृतदेहांमधून नमुने कसे घेतले जातात?
गंभीरपणे जळालेल्या शरीरातून डीएनए काढण्यासाठी फेमर, ह्यूमरस किंवा बरगड्यांसारख्या हाडांचे नमुने घेतले जातात. याशिवाय, दात किंवा उर्वरित ऊती देखील खूप प्रभावी आहेत. प्रत्यक्षात, हाडे आणि दात खूप महत्वाचे आहेत कारण उच्च तापमानातही त्यांच्यामध्ये डीएनए जतन केला जातो.
नातेवाईकांकडून नमुने घेतले जातात
नातेवाईकांकडून रक्त, लाळ किंवा गालाच्या पेशी (बकल स्वॅब) घेतले जातात. हे नमुने मृतांच्या डीएनएशी जुळण्यासाठी वापरले जातात.
नमुना प्रथम स्वच्छ केला जातो
अपघातात जळालेल्या मृतदेहांमधून डीएनए काढणे अत्यंत कठीण आहे, कारण उच्च तापमान आणि रसायने डीएनए नष्ट करू शकतात. अशा परिस्थितीत, नमुना प्रथम स्वच्छ केला जातो, जेणेकरून कचरा किंवा सूक्ष्मजीव यांसारखे बाह्य दूषित घटक काढून टाकता येतील. यासाठी, नमुना नळाच्या पाण्याने आणि १०० टक्के इथेनॉलने धुतला जातो. हाडे आणि दात पावडरमध्ये बारीक करण्यासाठी निर्जंतुकीकरण उपकरणे वापरली जातात.
हाडांमधून डीएनए कसा काढला जातो?
डीएनए काढण्यासाठी सेंद्रिय निष्कर्षण प्रक्रिया वापरली जाते. या अंतर्गत, नमुना रासायनिक द्रावणात टाकून डीएनए वेगळे केले जाते. अहमदाबाद अपघातात विमानाला लागलेल्या आगीमुळं मृतदेह मोठ्या प्रमामात प्रभावित झाले होते. अशा परिस्थितीत, डीएनएच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. जळलेल्या अवशेषांमधून डीएनए काढण्यात नवीन तंत्रे यशस्वी झाली आहेत.
तपासणीसाठी किती डीएनए आवश्यक?
रिअल-टाइम पीसीआर (पॉलिमरेज चेन रिअॅक्शन) द्वारे काढलेल्या डीएनएचे प्रमाण आणि गुणवत्ता तपासली जाते. अशा परिस्थितीत, सर्वप्रथम डीएनए चाचणीसाठी पुरेसा आहे की नाही याची खात्री केली जाते.
डीएनए प्रोफाइलिंग कसे केले जाते?
डीएनए प्रोफाइलिंगमध्ये, शॉर्ट टँडम रिपीट्स (STR) तपासले जातात. हे डीएनएचे असे भाग आहेत जे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे असतात. त्यानंतर, डीएनए प्रोफाइल तयार केले जाते. अहमदाबाद अपघातात सुमारे 1000 डीएनए चाचण्या केल्या जात आहेत, ज्यामध्ये मृतांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे नमुने जुळवणे समाविष्ट आहे.
कोणत्या नातेवाईकांचे नमुने घेतले जातात?
मृतांचे डीएनए प्रोफाइल नातेवाईकांच्या नमुन्यांशी जुळवले जाते. यासाठी, पालक किंवा मुलांच्या डीएनएशी जुळवणे अधिक अचूक मानले जाते, कारण त्यांच्यात अधिक अनुवांशिक समानता आहे. जर अहमदाबाद विमान अपघातासारख्या अपघातात तपास केला जात असेल, तर डीएनए चाचणीच्या या प्रक्रियेला अनेक दिवस लागू शकतात.
महत्वाच्या बातम्या: