Air India Plane Crash Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात (Air India Plane Crash Ahmedabad ) झाला आहे. या अपघातात एकूण 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 16 जणांचा समावेश आहे.  दरम्यान, या अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाला आहे. ते अहमदाबादहून लंडनला त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी जात होते. दरम्यान, विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्याआधी विमान अपघातात काही बड्या नेत्यांचा देखील मृत्यू झाला आहे याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

विमान अपघातात मृत्यू झालेल्या बड्या नेत्यांची माहिती

वायएस राजशेखर रेड्डी

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचेही विमान अपघातात निधन झाले होते. 2 सप्टेंबर 2009 साली खराब हवामानामुळं त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. 

दोरजी खांडू

30  एप्रिल 2011 रोजी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. त्यांचे पवन हंस हेलिकॉप्टर जमिनीवरील नियंत्रणाशी संपर्क तुटल्याने अपघातात पडले. पाच दिवसांनंतर, तवांगमध्ये विमानाचा अवशेष सापडले होते. 

ओपी जिंदल आणि सुरेंद्र सिंह

प्रसिद्ध उद्योगपती आणि हरियाणाचे ऊर्जामंत्री ओपी जिंदल आणि कृषीमंत्री सुरेंद्र सिंह 2005 मध्ये हेलिकॉप्टर अपघाताचे बळी ठरले. त्यांचे किंग कोब्रा हेलिकॉप्टर दिल्लीहून चंदीगडला जात असताना, उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे अपघात झाला होता. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता. 

माधवराव सिंधिया

देशाचे माजी रेल्वेमंत्री माधवराव सिंधिया यांचे 30 सप्टेंबर 2001 रोजी कानपूर येथे एका राजकीय रॅलीला जात असताना विमान अपघातात निधन झाले होते.

संजय गांधी

इंदिरा गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते संजय गांधी यांचेही विमान अपघातात निधन झाले होते. ही दुर्घटना 23 जून 1980 रोजी घडली होती.

होमी जहांगीर भाभा

देशातील महान शास्त्रज्ञ होमी महांग्री भाभा यांचेही एअर इंडियाच्या विमान अपघातात निधन झाले होते. 24 जानेवारी 1966 रोजी एअर इंडियाच्या फ्लाईट 101 ला अपघात झाला होता.

सीडीएस बिपिन रावत

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत देखील अशाच अपघाताचे बळी ठरले. 8 डिसेंबर 2021 रोजी सीडीएस विपिन रावत हेलिकॉप्टरने सुलूरमधील वेलिंग्टनला जात होते, त्या दरम्यान त्यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कुन्नूर येथे कोसळले. त्यांच्या पत्नी आणि इतर 11 लोकही विमानात होते.

महत्वाच्या बातम्या:

Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातच्या विमान अपघाताची दाहकता समोर, महाराष्ट्रातील 16 जणांचा मृत्यू, सर्वाधिक क्रू मेंबर्स मराठी!