Air India plane crash: गुजरातच्या अहमदाबाद मध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे .अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात 242 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान दाटीवाटीच्या रहिवासी भागात कोसळलं . गुजरातहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया AI 171 हे विमान अहमदाबाद च्या सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाहून टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात क्रॅश झाले . तब्बल 700 फुटांवरून हे विमान कोसळलं आहे . घटनास्थळी प्रचंड आग व धुराचे काळे लोट दिसत आहेत .अपघातानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाले आहेत .पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद विमानतळ बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे . (Gujrat Plane Crash)
दुपारी एक वाजून 17 मिनिटांनी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केलेले एअर इंडियाचे प्रवासी विमान रहिवासी भागात काही मिनिटातच कोसळले .या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाने असण्याची शक्यता आहे .त्यांचा बोर्डिंग पासही समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे .
पुढील सूचनेपर्यंत अहमदाबाद विमानतळ बंद
एअर इंडियाच्या प्रवासी विमानाच्या अपघातानंतर पुढील सूचनेपर्यंत अहमदाबाद विमानतळ बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे .आज दिल्लीहून अहमदाबाद ला जाणारी चार इंडिगो आणि पाच एअर इंडियाची उड्डाणे ही रद्द करण्यात आली आहेत . या अपघातानंतर सर्व विमानतळ मार्ग बंद करण्यात आले आहेत . सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे विमान एआय 171 आज सकाळी उड्डाणानंतर काही वेळातच विमानतळाबाहेर कोसळले. त्यानंतर, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबाद पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी नवीनतम अपडेटसाठी त्यांच्या संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू
अहमदाबाद मध्ये दाटी-वाटीचा परिसर असणाऱ्या भागात एअर इंडियाचा प्रवासी विमान क्रश झाल्यानंतर युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी प्रशासनाला दिले आहेत .जखमी प्रवाशांना त्वरित उपचार देण्यास सांगण्यात आले आहे .
अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघाताच्या ठिकाणी बचाव आणि मदत कार्य सुरू आहे .जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू असून जखमी किंवा मृतांना नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केला जात आहे .गांधीनगर होऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 90 कर्मचाऱ्यांच्या तीन तुकड्या विमान अपघात स्थळी पाठवण्यात आले आहेत .वडोदराहून आणखी तीन तुकड्या पाठवण्यात येत आहेत .
एअर इंडियाची पहिली प्रतिक्रिया ..
दरम्यान विमान अपघातानंतर एअर इंडियाने त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून अहमदाबाद ते लंडन गेट विक या विमानाने उड्डाण घेतलेली AI171 ही फ्लाईट त्रास झाली असून या दुर्घटनेतील तपशिलांची पडताळणी करत असल्याचं एअर इंडियाने x माध्यमावर पोस्ट करून सांगितलं आहे .
हेही वाचा