नवी दिल्ली : एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सना प्रत्येक उड्डाणाच्या घोषणेनंतर पूर्ण जोशाने 'जय हिंद' बोलणं अनिवार्य असणार आहे. विमान प्रवासादरम्यान, सर्व कॅबिन क्रू आणि कॉकपिटमधील क्रू मेंबर्सना तशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
एअर इंडियाचे तत्कालीन चेअरमन अश्वनी लोहानी यांनी मे 2016 मध्ये आपल्या वैमानिकांना 'जय हिंद' बोलण्याच्या सूचना दिल्या होत्या. विमानाचा कॅप्टनने प्रवासात सदैव आपल्या प्रवाशांसी सोडलेलं असणं गरजेचं आहे आणि 'जय हिंद' बोलल्याने मोठा परिणाम होतो.