जयपूर : जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका एअरहोस्टेसने वादावादीनंतर पायलटच्या थोबाडीत मारली. रविवारी रात्री ही घटना घडली. संबंधित एअरहोस्टेस गुडगावमधील असल्याचं कळतं. विमानतळावर उपस्थित सुरक्षारक्षकांनी दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी झाले.
सूत्रांच्या माहितीनुसार, एअरहोस्टेसने पायलटचा मोबाईल चक्काचूक केला. यानंतर विमानतळावर उपस्थित सीआयएसएफ जवानांना हस्तक्षेप करावा लागला. यादरम्यान, दोघांना विमानतळ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. त्यांनी या घटनेची माहिती सांगानेर पोलिस स्टेशनला दिली.
सांगानेर पोलिस स्टेशनचे इनचार्ज शिव रतन गोदरा यांच्या माहितीनुसार, "दोघांचं वैयक्तिक भांडण असल्याचं समजून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला त्यांच्यामध्ये हस्तेक्षप केला नाही. पण काही वेळाने ते हाणामारी करायला लागले. प्रवाशांची गर्दी तिथे जमा झाली. संबंधित पायलट काही वेळ आधीच विमानाने तिथे पोहोचला होता, तर एअरहोस्टेस गुडगाववरुन इथे आली होती. या प्रकरणाचा तपास सुरु आहे."
पोलिसांनी या घटनेच्या कारणांची माहिती दिलेली नाही. पण दोघांमध्ये वैयक्तिक वाद असू शकतो, असं पोलिसांनी सांगितलं.
जयपूर विमानतळावर एअरहोस्टेसने पायलटला थोबाडीत मारलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Sep 2017 11:27 AM (IST)
सूत्रांच्या माहितीनुसार, एअरहोस्टेसने पायलटचा मोबाईल चक्काचूक केला. यानंतर विमानतळावर उपस्थित सीआयएसएफ जवानांना हस्तक्षेप करावा लागला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -