नवी दिल्ली : भारत-चीन सीमाभागातील गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. याचदरम्यान भारतीय लष्कराची ताकद वाढली आहे. 27 जुलैपर्यंत फ्रान्सकडून भारताला सहा लढाऊ राफेल विमानं मिळणार आहेत. या राफेल विमानांमुळे भारतीय हवाईदलाचे सामर्थ्य अनेकपटींनी वाढणार आहे. एकीकडे चीनकडून सीमेवर सैन्याची आणि युद्धसामुग्रीची जमवाजमव सुरू आहे. अशावेळी भारतीय वायुदलाच्या ताफ्यात राफेल विमाने दाखल होणार असल्याने भारताचंही सामर्थ वाढणार आहे.



फ्रान्सवरुन उड्डाण केल्यानंतर ही विमानं भारताच्या अंबाला येथील हवाई दलाच्या स्टेशनवर उतरणार आहेत. राफेल विमानांसाठी अंबाला एअरबेस वर वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात आलं आहे. यात विमान उभं करण्यासाठी लागणारे हँगर, एयर-स्ट्रीप आणि कमांड एँड कंट्रोल प्रणालिचा समावेश आहे.


आता चीनकडूनही भारतीय निर्यातीच्या कस्टम क्लियरन्समध्ये अडथळे 



लढाऊ राफेल वायुदलाची ताकद वाढवणार


भारतीय वायुदलात राफेल विमानांचा समावेश दक्षिण आशियामध्ये 'गेमचेंजर' मानला जात आहे. कारण, राफेल 4.5 जेनरेशन मीडियम मल्टीरोल एयरक्राफ्ट आहे. मल्टीरोल असल्याने राफेल विमान शत्रूच्या सीमाभागात घुसून अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता ठेवते. त्यामुळे राफेलचा समावेश हवाई दलात झाल्यानंतर भारताची ताकद आणखी वाढणार आहे. माहितीनुसार, राफेलचे विमान पोहचण्यासाठी त्याची क्षेपणास्त्र त्याआधीच अंबाला येथे पोहचणार आहे. मिटयोर या क्षेपणास्त्रची लक्ष्य भेदण्याची क्षमता 150 किलोमीटर इतकी मोठी आहे. हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या मिसाइलमध्ये जगातील सर्वाधिक घातक हत्यारांमध्ये याचा समावेश होतो. यासोबतचं राफेल फायटर जेट लांबूनचं हवेतून जमीनीवर मारा करणारे स्कॅल्प क्रूज मिसाइल आणि हवेत मारा करता येणारे मायका मिसाइलचाही समावेश आहे.



फ्रान्सशी 36 राफेल विमानांचा करार


सप्टेंबर 2016 मध्ये केंद्र सरकारने फ्रान्सशी 36 राफेल विमानांच्या खरेदीसाठी तब्बल 59 हजार कोटीचा करार केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दसॉल्ट कंपनीकडून एकूण 10 राफेल विमाने तयार करण्यात आली आहेत. यापैकी सहा विमाने भारतात पाठवण्यात येतील. जुलैच्या अखेरीस ही विमाने भारताच्या दिशेने उड्डाण करतील. दहापैकी केवळ सहा विमानेच भारतात आणण्यात येतील. उर्वरित चार विमाने भारतीय वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी फ्रान्समध्येच ठेवण्यात येतील.


India China Dispute | सीमेवरील घटनेची मोदींनी योग्य ती माहिती द्यावी : पृथ्वीराज चव्हाण