अल्केमिस्ट एअरलाईन्सचं हे एअर अॅम्ब्युलन्स पाटणाहून दिल्लीला जात होत. विमानात एकूण सात प्रवासी होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, विमानातील सर्व सात प्रवासी सुरक्षित आहे. या सात जणांमध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे. इमर्जन्सी लँडिंगच्या वेळी एकाला दुखापत झाली आहे. दोन्ही इंजिनात बिघाड झाल्याने अॅम्ब्युलन्सची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली.
"पाटणाच्या ज्या रुग्णाला एअर अॅम्ब्युलन्समधून दिल्लीला आणलं जात होतं तो रुग्णालयात पोहोचला आहे. देवेंद्र याच्यावर उपचार सुरु झाले आहेत," अशी माहिती मेदांता हॉस्पिटलचे प्रवक्ते जुगल शर्मा यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ