Gujarat Air India Plane Crash: गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Gujarat Airplane Crash) आज (12 जून) दुपारी भयावह दुर्घटना घडली. एअर इंडियाचे AI 171 हे प्रवासी विमान (Air India Plane Crash Ahmedabad Gujarat) कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघाताच्यावेळी विमानामध्ये तब्बल 242 प्रवासी होते. त्यामुळे या दुर्घटनेत खूप मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानीनगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

1) एअर इंडियाचे AI 171 विमान दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लंडनला जाण्यासाठी हवेत उड्डाण केले.  

2) 1 वाजून 38 मिनिटांनी विमानाचा अखेरचा सिग्नल मिळाला होता. त्यानंतर विमानचा अपघात झाला. एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर हे विमान अत्यंत उत्कृष्ट विमानांपैकी एक आहे. 

3) जगातील अनेक प्रमुख विमान कंपन्या या विमानाचा वापर करतात. या विमानाची प्रवाशी क्षमता 300 इतकी आहे. अपघाताच्यावेळी विमानात 242 प्रवासी होते, असे सांगितले जात आहे.  हा अपघात नेमका कसा झाला, याचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही.

4) अहमदाबादहून लंडनला म्हणजेच दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला.

5) एअर इंडियाचं सदर विमान ज्या इमारतीवर कोसळलं, ती रुग्णालयाची इमारत होती. त्यामुळे रुग्णालयाचं देखील मोठं नुकसाना झालं आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात देखील जीवितहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

6) सध्या, एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र 242 प्रवाशी आणि 12 क्रु विमानात होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. 

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने काय सांगितलं?

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ( DGCA )नं दिलेल्या माहितीनूसार, 12 जून 2025 रोजी अहमदाबादहून गॅटविकला जाणारं एअर इंडियाचं बी787 विमान (एआय-171) टेकऑफनंतर लगेचच कोसळलं. या विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल चालवत होते, तर त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते. सुमित सभरवालला 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर क्लाईव्हला 1100 उड्डाण तासांचा अनुभव होता. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, या विमानानं अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी 23 वरून दुपारी 1.39 वाजता उड्डाण केलं. उड्डाण घेताच, जवळच्या एटीसीला मेडे कॉल पायलटकडून दिला गेलेला, पण त्यानंतर विमानानं एटीसीला कोणताही सिग्नल दिला नाही. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान क्रॅश झालं. 

संबंधित बातमी:

Gujarat Air India Plane Crash: गुजरातमध्ये 200 हून अधिक प्रवासी असणारं Air India चं विमान कोसळलं; सगळं चक्काचूर झालं, भयावह PHOTO समोर