Sonam Raghuvanshi Case: मधुचंद्रासाठी पती राजा रघुवंशीला मेघालयाला घेऊन जात आपल्या प्रियकराच्या मदतीने हल्ला करून संपवणाऱ्या सोनम रघुवंशीची सध्या देशभरात चर्चा आहे. पोलीस तपासात दररोज या प्रकरणाचे नवनवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. लग्नानंतर तीन दिवसांमध्येच सोनम रघुवंशीने राजाच्या हत्येची पूर्ण योजना आखली होती. यासाठी तिचा कथित प्रियकर राज कुशवाह याच्यासोबतचे स्क्रीनशॉटही पोलीस तपासात समोर आले आहेत. (Crime News)
हत्येचा प्लॅन फसला तर बॅकअप प्लॅनही होता तयार
राजा रघुवंशीला ठार मारण्यासाठी निर्जन परिसरात नेटदरीत ढकलून देण्याचा कट रचला होता. मात्र हा प्लॅन यशस्वी झाल्यास बॅकअप प्लॅन आहे त्याच्या डोक्यात होता. मधुचंद्रासाठी तिने स्वतःहून पूर्ण योजना आखली. हनिमून साठी घेऊन जात तिथेच पती राजा रघुवंशीचा काटा काढायचा हे ठरवूनच प्रियकर राज आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना हाताशी धरत सोनमने पती राजा रघुवंशीचा खून केला. जर राज कुशवाह आणि त्याचे साथीदार राजाला मारण्यास अ यशस्वी झाले तर सेल्फी काढण्याच्या पाहण्याने त्याला उंच डोंगरावर नेत तिथून खाली ढकलून देण्याचा बॅकअप प्लॅनही तयार होता.
राजा सोबत शरीर संबंध टाळण्याचे कारणही ठरवलं
हनिमूनसाठी मेघालयाला घेऊन गेलेल्या सोनम ने राजा रघुवंशी सोबत शरीर संबंध टाळण्यासाठी आणि शक्य तेवढा वेळ दवडण्यासाठी कारणही रचलं होतं. सोनवणे मेघालयाला जाण्यापूर्वी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाण्याचा आग्रह केला. 23 मे रोजी राजा आणि सोनम यांनी मेघालयातील नोंग्रियाट गावातून चेकआउट केले. 10 दिवसानंतर राजा रघुवंशीचा मृतदेह तेथून 20 km लांब असणाऱ्या खोलदरीत कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला .
सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांच्यासोबत केलेल्या चॅटिंगच्या स्क्रीनशॉट नुसार, 'राजासारखं जवळ येत आहे .हे मला अजिबात आवडत नाहीये' .असा मेसेजही तिने तिच्या प्रियकराला केला होता .सोनम रघुवंशीसह चार अन्य आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत .मेघालय पोलीस त्यांना आपल्या ताब्यात घेऊन गेले आहेत .दरम्यान मेघालय पोलिसांच्या तपासानुसार सोनम चे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर ती आरोपी राज कुशवाह सोबत बोलत असल्याचे निदर्शनास आले .त्यामुळे सोनं भोवतीच गुढ अधिक गडद झालं .
हेही वाचा