नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
मीडियात चमकण्यासाठी शेतकरी आंदोलन सुरु असल्याचं वक्तव्य राधामोहन सिंह यांनी केलं.
राधामोहन सिंह म्हणाले, “मीडियात चमकण्यासाठी काहीतरी वेगळं काम करावं लागतं. काही वेगळं केलं तरच मीडिया प्रसिद्धी देते”.
शेतमालाला भाव नाही, लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाला आलेला घास दुरावला जात आहे. त्यामुळे शेतकरी स्वत:च्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहे. मात्र खुद्द कृषीमंत्रीच असं वक्तव्य करत असल्याने त्यांनी एकप्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना आहे.
राधामोहन सिंह यांनी पहिल्यांदाच वादग्रस्त वक्तव्य केलंय असं नाही. त्यांनी यापूर्वीही अशा विधानांची मालिका केली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रेमप्रकरणं, कौटुंबिक कलह आणि व्यसनाधिनता जबाबदार असल्याचं अजब उत्तर केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत दिलं होतं.
राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राधामोहन सिंह यांच्यावर हल्ला चढवला. अशा मंत्र्यांना लाथ मारुन मंत्रिमंडळातून हाकला. राधामोहन सिंह यांच्या वक्तव्यावरुन त्यांची लायकी समजली, असं राजू शेट्टी म्हणाले.
शेतकरी आंदोलनाचा दुसरा दिवस
राष्ट्रीय किसान महासंघाच्या शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री बंद असल्याने भाजीपाला महागला आहे. किसान महासंघाच्या घोषणेप्रमाणे राज्यातले शेतकरी 10 जूनपर्यंत संपावर असतील. या संपात देशभरातील सुमारे 120 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत.
या शेतकरी संपाला महाराष्ट्रातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरी भागातही याचा परिणाम जाणवू लागला आहे. मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये आज नेहमीपेक्षा निम्म्याच भाजीपाला गाड्या दाखल झाल्या आहेत. परिणामी मार्केटमध्ये आज भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत.
पुढील दहा दिवस हा संप जर सुरु राहिल्यास भाजीपाल्याचे दर गगनाला भिडतील आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावरच होणार आहे. त्यामुळे या संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी भाजी व्यापारी करत आहेत.
संबंधित बातम्या
केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह खुल्या भिंतीवर लघुशंका करताना कॅमेऱ्यात कैद
केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या गाडीवर अंडीफेक
कृषीमंत्र्यांचा रात्री 11 वाजता महिला खासदारांना मेसेज : पवार
पीकविमा मुदतवाढीचं तुमचं तुम्ही बघा, केंद्राचे हात वर
कृषीमंत्री म्हणतात चमकोगिरीसाठी शेतकरी संप, राजू शेट्टी म्हणाले कृषीमंत्र्यांची लायकी समजली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jun 2018 05:10 PM (IST)
मीडियात चमकण्यासाठी शेतकरी आंदोलन सुरु असल्याचं वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -