Agniveers First Batch Passing Out Parade : भारतीय लष्करासाठी (Indian Amry) आजचा दिवस फारच महत्त्वाचा आणि ऐतिहासिक आहे. आज अग्निवीरांची (Agniveer) पहिली तुकडी नौदलात (Indian Navy) दाखल होणार आहे. आयएनएस चिल्का (INS Chilka) वर पासिंग आऊट परेड (Agniveer Passing Out Parade) पार पडणार आहे. या सोहळ्याला नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे. जून 2022 मध्ये तिन्ही सैन्य दलासाठी अग्निपथ योजनेची घोषणा करण्यात आली होती.
2600 अग्नीवीर नौदलात सामील होणार
मीडिया रिपोर्टनुसार, प्रशिक्षण घेत असलेल्या सुमारे 2600 अग्निवीरांची तुकडी आज नौदलात सामील होणार आहे. यामध्ये 273 महिला अग्निवीरांचाही समावेश आहे. INS चिल्कावर मोठ्या दिमाखात पासिंग आऊट परेड सोहळ्यात हे प्रशिक्षित अग्निवीर नौदलात रुजू होतील. नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार पासिंग आऊट परेडचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
ऐतिहासिक दिन, पहिल्यांदाच सूर्यास्तानंतर होणार परेड
आज होणारी पासिंग आऊट परेड अनेक अर्थाने खास ठरणार आहे. अग्निवीरांची पहिली तुकडी पहिल्यांदाच तैनात होणार आहे, तसेच ही परेड सूर्यास्तानंतर होणार आहे. पहिल्यांदाच सूर्यास्तानंतर परेड होणार आहे. पारंपारिक पद्धतीने, पासिंग आऊट परेड सकाळी आयोजित केली जाते, पण भारतीय सशस्त्र दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच ही परेड सूर्यास्तानंतर आयोजित करण्यात आली आहे.
अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची भरती
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही लष्कर प्रमुखांनी 14 जून 2022 रोजी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. भारत सरकारच्या पॅन-इंडिया मेरिट-आधारित अग्निपथ भरती योजनेअंतर्गत ही योजना सुरु करण्यात आली. नौदलाने या संधीचा फायदा घेत महिला अग्निवीरांच्या प्रवेशालाही परवानगी दिली. त्यामुळे आज, 273 महिला अग्निवीरांसह सुमारे 2,600 अग्निवीरांना भारतीय नौदलात भरती करण्यात आलं आणि त्यांचं प्रशिक्षण नोव्हेंबर 2022 मध्ये INS चिल्का येथे सुरू झालं. आज त्यांची पासिंग आऊट परेड पार पडणार आहे.
अग्निवीरांना युद्धनौका, लष्करी तळांवर तैनात करणार
भारतीय नौदलाच्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड (POP) 28 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. पासिंग आऊट परेड आयएनएस चिल्का येथे पार पडेल. आयएनएस चिल्का नौदलाच्या प्रमुख प्रशिक्षण तळांपैकी एक आहे. अग्निवीरांच्या या बॅचमध्ये अनेक तरुणींचाही समावेश आहे. पासिंग आऊट परेडनंतर या अग्निवीरांना नौदलाच्या युद्धनौका आणि समुद्रातील इतर लष्करी तळांवर तैनात केलं जाईल.