Onion Price Hike : टोमॅटोच्या (Tomato) वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे याचा परिणाम जेवणाच्या थाळीवरही झाला आहे. नुकत्याच रेटिंग एजन्सी क्रिसिल (CRISIL) च्या अहवालानुसार, शाकाहारी थाळी (Veg Food) 28% महाग झाली आहे. तर, मांसाहारी थाळी (Non-Veg Food) 11% महाग झाली आहे. यानुसार टोमॅटोने सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. टोमॅटोबरोबर इतर भाज्यांचे दरही वाढले आहेत. इतकंच नाही तर या महिन्याच्या अखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या किंमतीत वाढ (Onion Price Hike) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात कांदा 35 ते 40 रूपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 


...यामुळे कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता 


पाऊस आणि पुराचा परिणाम आता कांद्यावरही होऊ लागला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून कांद्याचा पुरवठा आता हळूहळू कमी होत आहे. साठ्यात ठेवलेला कांदा पुढील महिन्यापासून बाहेर पडण्यास सुरुवात होणार असून त्यामुळेच येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढणार आहेत. सध्या कांदा 30 रुपये किलोने बाजारात विकला जातोय. मात्र, व्यापारी ज्या प्रकारे चिंता व्यक्त करत आहेत, त्यावरून भविष्यात कांदा 35 ते 40 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.


दिल्लीच्या आझादपूर मंडीत या व्यापाऱ्यांनी दिली प्रतिक्रिया


एबीपी न्यूजने दिल्लीच्या आझादपूर मंडईतील अनेक कांदा व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या व्यापाऱ्यांनी सांगितले की, कांद्याचे भाव आता काही काळ स्थिर आहेत. परंतु, येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढू शकतात. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पाऊस आणि पूर. पुढे ते म्हणाले की, पूर आणि पावसामुळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या कांद्याचा पुरवठा हळूहळू कमी झाला आहे. याचाच अर्थ पूर आणि पावसाचा कांद्यावर परिणाम झाला आहे. तर, ज्या कांद्याचा साठा करून ठेवलेला आहे. तो आता हळूहळू बाहेर पडू लागेल, त्यामुळे कांद्याचे भाव वाढणार आहेत.


त्यामुळेच सध्या बाजारात 17 ते 20 आणि 22 रुपये किलोने उपलब्ध असलेला आणि किरकोळ बाजारात 30 रुपये किलोने उपलब्ध असलेला कांदा येत्या काही दिवसांत 35 ते 40 रुपये प्रतिकिलो होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


10th August In History : ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व करणारे जनरल अरुणकुमार वैद्य यांची दहशतवाद्यांकडून हत्या; आज इतिहासात