rape victim mother untold story : वयाच्या 12 व्या वर्षी अत्याचार झाल्यानंतर त्यातून मुलगा जन्माला येतो. मात्र, अत्याचार झालेल्या पीडित मुलीचं वय पाहता नवजात बालक दगावल्याचे सांगितलं जातं, पण त्याचीच भेट पुन्हा तब्बल 12 वर्षांनी होते आणि तो म्हणतो तुच माझी आई आहेस आणि तिला मुळापासून हादरा बसतो. मात्र, भूतकाळात घडलेल्या घटनांची माहिती जेव्हा सख्ख्या बहिणीकडून मिळते तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकते. मात्र, अत्याचारातून जन्माला आलेल्या मुलगा समाजाला फाट्यावर मारून आईला न्याय द्यायचा ठरवतो आणि तब्बल 24 वर्षांनी न्याय मिळवून देत 12व्या वर्षी झालेल्या अत्याचारातील नराधमांना जेलमध्ये पाठवतो. ही कथा किंवा पटकथा कोणत्या चित्रपटातील नसून उत्तर प्रदेशातील शहाजहानपूरमधील आहे. अत्याचार झाल्यानंतर न्याय होण्यापेक्षा लपवालपवीचा घृणास्पद प्रकार होत असताना या मुलाने दाखवलेली जिद्द नक्कीच पेरणादायी आहे. 


मुलाचा जन्म होताच मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले


अत्याचारातून जन्मलेला मुलगा पिंकीच्या दारापर्यंत (नाव बदललं आहे) येतो. पिंकी काळजी घेण्यास सुरुवात करते. 12व्या वर्षी झालेल्या बलात्कारामुळे वयाच्या 13 व्या वर्षी या मुलाचा जन्म झाला. मुलाचा जन्म होताच मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले होते. दरम्यानच्या काळात पिंकीचे लग्न करून देण्यात आले. मात्र, बलात्काराची घटनेची माहिती होताच त्याने पिंकीला मुलासह घरातून हाकलून दिले.त्याच कालावधीमध्ये एका मुलासोबत एकटी राहत असताना अत्याचारात जन्माला आलेल्या मुलगा जवळ येऊन धीर देतो. तब्बल 25 वर्षांनंतर बलात्कार करणाऱ्यांवर खटला भरला गेला आणि त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. पिंकीची कहाणी उत्तर प्रदेशातील शाहजहानपूरपासून सुरू होते. पाच बहिणी आणि दोन भावांमध्ये पिंकी तिसरी बहीण होती. घरातील बहुतेक लोक सैन्यात होते. माझे वडील सैनिक होते. पिंकीला पोलिसात भरती व्हायचे होते.


पिंकीची कहाणी उत्तर प्रदेशातील शाहजहानपूरपासून सुरू होते. पाच बहिणी आणि दोन भावांमध्ये पिंकी तिसरी बहीण होती. घरातील बहुतेक लोक सैन्यात होते. माझे वडील सैनिक आहेत. पिंकीला पोलिसात भरती व्हायचे होते. 1994 मध्ये माझ्या वडिलांनी मला गावातून बहिणीकडे शिकायला पाठवल्यानंतर पिंकीला टवाळखोरांच्या उन्मादाला सामोरे जावं लागलं   मुलींचे केस ओढणे, पाठीवर हात ठेवणे हे त्यांच्यासाठी सामान्य होते. पिंकीसोबतही हेच घडले. तीन वर्ष हा प्रकार सुरु असताना पिंकीला एके दिवशी एका मुलाने मला बळजबरीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. घरी सांगूनही दुसऱ्या मार्गाने शाळेत जा, असा सल्ला देण्यात आला. सांगून कोणताच परिणाम झाला नाही. टवाळखोरांमध्ये लकी हसन आणि गुड्डू हसन अशी आणखी दोन मुलं होती. दोघेही ट्रक चालवायचे. एके दिवशी संधी मिळताच दोघेही भिंतीवरून उडी मारून पिंकीच्या घरात घुसले आणि बलात्कार केला.  


बलात्कारातून मुलाचा जन्म


घराबाहेर पडताना दोघांनीही चाकू दाखवत सांगितले की,  घरी काही सांगितले तर तुझ्या बहिणीला आणि भावाला मारून टाकू. भीतीने पिंकी गप्प राहिली. पुढील सहा महिने पिंकीवर बलात्कार होत राहिला. पिंकीची तब्येत बिघडू लागल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. बहिण पतीसह शोध घेण्यासाठी गेली. दोघेही परत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर रक्त होते.  बहिणीने सगळा प्रकार वडिलांना सांगितला. दुसऱ्याच दिवशी पिंकीला बहिणीसह डेहराडूनला पाठवण्यात आले. या सगळ्यात 1995 मध्ये मी एका मुलाला जन्म दिला.


कुटुंबीयांनी पिंकीला लहान वयामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर चार वर्षांनी म्हणजे 199 मध्ये पिंकीचे लग्न झाले. लग्न झाल्यावर बनारसला आली. 2002 मध्ये मुलगा झाला. मुलगा झाल्यानेआयुष्य अधिक सुंदर होईल असे वाटत होते, पण इर्षेपोटी सासरच्या घरी एका नातेवाईकाने शहाजहानपूरची घटना सांगितली. त्यानंतर  त्याने घरातून बाहेर काढले. 2007 मध्ये पिंकीने माझ्या बहिणीला पत्र लिहून सर्व काही सांगितले. त्यांनी लखनौमध्ये राहण्याची व्यवस्था केली. पिंकीने शिवणकाम करण्यास सुरुवात केली. काम करतच पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.


माझे वडील कोण आहेत? 


पिंकी एप्रिल 2010 मध्ये जेव्हा मोठ्या मुलाला पहिल्यांदा भेटली तेव्हा लहान मुलगा आठ वर्षांचा होता. 2019 मध्ये एका दुपारी, मोठ्या मुलाने मला बसवले आणि विचारले की, माझे वडील कोण आहेत? जर तो जिवंत असेल तर मी त्याला शोधून परत आणेन. पिंकीला काय उत्तर द्यावे हेच कळत नव्हते. पिंकीने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला, पण तो मानायला तयार नव्हता. शेवटी पिंकीने दोन्ही मुलांना बसवून शाहजहानपूरची घटना सांगितली. एके दिवशी दोन्ही मुलं पिंकीला म्हणाले की, ‘आपण त्या बलात्काऱ्यांना शोधून त्यांच्यावर खटला भरला पाहिजे.’ हे ऐकून पिंकी घाबरून गेली. पिंकीला बहिणीच्या आणि भावाच्या चेहऱ्यावरचे रक्त आणि त्यांचे फाटलेले कपडे आठवले. मोठा मुलगा म्हणाला, किती दिवस असेच जगणार? आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. दोन्ही मुलांमुळे पिंकीने खटला दाखल करण्याचा, पण गुन्हेगार आता कुठे असतील याची कल्पना पिंकीला नव्हती. 


यानंतर दर वीकेंडला पिंकी शहाजहानपूरला जाऊ लागली. चेहरा स्कार्फने झाकायची आणि त्या गुन्हेगारांचा शोध घेत शहरात फिरायची. त्यावेळी पिंकीचा पगार फक्त पंधरा हजार होता.  आर्थिक चणचण असूनही, मला आत्मविश्वासाची नवी पातळी मिळाली होती. दोन वर्षांनी पिंकीला गुन्हेगार दिसून आल्यानंतर पिंकीच्या हृदयाचा ठोका चुकला. पिंकीने त्यांचा नंबर पोलीस स्टेशनला दिला आणि लखनौला गेली.  पोलिसांनी मार्च 2021 मध्ये गुन्हा नोंदवला आणि एप्रिल 2021 मध्ये डीएनए चाचणी घेण्यात आली आणि आरोपी गजाआड गेले. त्यामुळे अत्याचारातून जन्मलेल्या मुलानेच आईला 24 वर्षांनी न्याय मिळवून दिला.