नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुका होऊन जवळपास दोन वर्ष लोटली आहेत. यंदा कोरोनाचं संकट, बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर देशातील राजकीय स्थितीमध्ये बराच बदल झाला आहे. या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सी व्होटरने सर्वे घेऊन देशाचा मूड जाणून घेतला. केंद्राच्या कामावर देशातील आणि राज्यातील जनता किती समाधानी आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या कामावर देशातील आणि राज्यातील जनता किती समाधानी आहे? याबाबत या सर्व्हेतून मतं जाणून घेतली गेली.
केंद्र सरकारच्या कामावर सरासरी 37 टक्के जनता समाधानी असल्याचं तर पंतप्रधान मोदींच्या कामावर सरासरी 45 टक्के जनता समाधानी असल्याचं या सर्व्हेतून दिसून आलं आहे. तर राहुल गांधी यांच्या कामावर 19 टक्के जनता खूप समाधानी तर 20 टक्के लोकं समाधानी असल्याचं समोर आलं आहे.
असा आहे संपूर्ण सर्वे
केंद्राच्या कामावर देशातील जनता किती समाधानी?
खूप समाधानी - 42 टक्के
समाधानी - 25 टक्के
असमाधानी - 30 टक्के
सरासरी - 37
पंतप्रधानांच्या कामावर देशाची जनता किती समाधानी?
खूप समाधानी - 49 टक्के
समाधानी - 22 टक्के
असमाधानी - 26 टक्के
सरासरी - 45 टक्के
पंतप्रधानांच्या कामावर राज्याची जनता किती समाधानी?
खूप समाधानी - 48 टक्के
समाधानी - 25 टक्के
असमाधानी - 26 टक्के
सरासरी - 47 टक्के
राहुल गांधींच्या कामावर देशाची जनता किती समाधानी?
खूप समाधानी - 19 टक्के
समाधानी - 20 टक्के
असमाधानी - 44 टक्के
राहुल गांधींच्या कामावर राज्याची जनता किती समाधानी?
खूप समाधानी - 17 टक्के
समाधानी - 21 टक्के
असमाधानी - 53 टक्के