ABP DESAM Launch : ABP नेटवर्क तेलगू बोलणाऱ्या आणि समजणाऱ्या सर्व वाचक-प्रेक्षकांसाठी तेलगू भाषेत एक नवा आणि अनोखा डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केलं आहे. ज्याचं नाव आहे 'एबीपी देसम'. एबीपी नेटवर्कच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत एक नवा सदस्य जोडला गेला आहे. एबीपी नेटवर्कने आपला ब्रँड न्यू डिजिटल प्लेटफॉर्म 'एबीपी देसम' लॉन्च केला आहे. एबीपी देसमच्या लॉन्चिंगसोबत एबीपी नेटवर्कने आंध्रप्रदेशमधील मार्केटमध्येही एन्ट्री केली आहे. आता प्रेक्षक तेलगु भाषेतून देश-विदेशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊ शकणार आहेत. 


एबीपी देसम एक डिजिटल पोर्टल आहे, जे पूर्णपणे तेलगु संस्कृती, नीतिशास्त्र आणि भावना यांचा संगम प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. याची टॅगलाईन 'मन वार्तालु, मन ऊरी भाषालो!" आहे. याचाच अर्थ, 'आमच्या बातम्या, आमच्या शहराच्या भाषेत'. या नव्या सादरीकरणासह, एबीपी नेटवर्क पुन्हा एकदा स्थानिक घडामोडी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तीन महिन्यांपूर्वी एबीपी नेटवर्कने तमिळनाडूतील प्रेक्षकांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म 'एबीपी नाडु' लॉन्च केलं होतं. 




एबीपी देसमच्या वेबसाईटवर तुमच्या क्षेत्रातील तेलगू भाषेत जगभरातील अनेक घडामोडी प्रकाशित केल्या जात आहेत. तुम्ही एबीपी देसमच्या वेबसाईटवर सर्वात जलद आणि अचूक बातम्या वाचू शकता. एबीपी देसमच्या वेबसाईटवर जाण्यासाठी telugu.abplive.com वर क्लिक करा. तेलगू भाषेत प्रत्येक बातमीसह स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी एबीपी देसमच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना फॉलो करा. 


एबीपी देसम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म :


twitter.com/abpdesam
facebook.com/abpdesam
instagram.com/abpdesam