देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प समर्थकांचा धुडगूस, ट्रम्प समर्थक आणि पोलिसांत धुमश्चक्री, पोलिसांच्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू,
2. नामांतरावरुन सरकारमध्ये मतभेद, शासकीय व्यवहारामध्ये औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख करण्याला काँग्रेसचा तीव्र आक्षेप,
5. पुढच्या तीन - ते चार दिवसांत महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता, स्कायमेटचा अंदाज,
6. शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हं, दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांची आज ट्रॅक्टर रॅली, कृषी कायद्याच्या समर्थनार्थ सिंधुदुर्गात भाजपची ट्रॅक्टर रॅली,
7. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटीचा खेळ पावसामुळे थांबला, टॉस जिंकणा-या ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात,
8. मुंबई पोलीस सायबर सेलकडून 'जामतारा' घोटाळा उघड, सहा आरोपी गजाआड. यामध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश,
9. टीआरपी केसमध्ये मुंबई पोलिसांच्या हाती आता सबळ पुरावे, राज्य सरकारची माहिती. अर्णब यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार नाही याची शाश्वती नाही,
10. वाहिन्यांवरील देवी-देवतांच्या यंत्र-तंत्राच्या जाहिराती बंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश, पुन्हा या जाहिराती झळकू नयेत म्हणून विशेष कक्ष (सेल) स्थापन करण्याचे निर्देश