Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी फक्त काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलाय. भाजप आणि काँग्रेससह प्रत्येक पक्षांने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी आपल्या रणनितीवर काम करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीचीही जोरदार तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजसाठी सी व्होटरनं एक सर्व्हे केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी सर्व्हे करण्यात आलाय, त्यामध्ये धक्कादायक आकडे समोर आलेत. 


एबीपी न्यूजसाठी सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता खूप जास्त असल्याचे समोर आलेय. पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान होताना जनतेला पाहायचं असल्याचं सर्व्हेतून दिसतेय. हा सर्व्हे उत्तर भारतामधील राज्यात केलाय.  पंतप्रधान म्हणून थेट निवड करायची असल्यास नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यापैकी कुणाला पसंती द्याल... असा प्रश्न सर्व्हेमध्ये विचारण्यात आला. 


आकडे काय म्हणतात...? 


सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, उत्तर भारतामधील बहुतांश राज्यात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच पसंती दिली आहे. 50 टक्केंपेक्षा जास्त मतं नरेंद्र मोदी यांच्या बाजूने पडली आहे. फक्त दोन राज्यातील आकडे राहुल गांधींच्या बाजूने आहेत, जिथे राहुल गांधींना 50 टक्केंपेक्षा जास्त मतं आहेत. सी व्होटरनं घेतलेला सर्व्हे  उत्तर प्रदेश, एमपी, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-कश्मीर यामधील लोकांचा कौल जाणून घेतलाय. 


सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील 60 - 60 टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी मोदींना पसंती दर्शवली आहे. दिल्ली आणि मध्य प्रदेशमधील 66 - 66 टक्के लोकांचा कौल मोदींच्या बाजूने आहे. राज्यस्थानमधील 65 टक्के आणि हिमाचलप्रदेशमधील 72 टक्के लोक मोदींच्या बाजूने असल्याचे दिसलेत. जम्मू काश्मीरमधील 58 टक्के लोकांचा कौल मोदींच्या बाजूने आहे. पंजाब आणि हरियाणा येथील लोकांनी मोदींना 50 टक्के पेक्षा कमी पसंती दर्शवली आहे. पंजाबमधील 35 आणि हरियाणातील 47 टक्केंची मते मोदींच्या पारड्यात आहेत. 


राहुल गांधींसाठी काय आकडे ?


सी व्होटरच्या सर्व्हेच्या आकडेवारीनुसार यूपीच्या 30 टक्के, मध्य प्रदेशातील 28, राजस्थानमधील 32, पंजाबमधील 36, हरियाणातील 36, दिल्लीतील 30, हिमाचल प्रदेशातील 26, उत्तराखंडमधील 21 आणि जम्मू-काश्मीरमधील 35 टक्के लोकांनी राहुल गांधींना पाठिंबा दिला आहे.  उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80, मध्य प्रदेशात 29, राजस्थानमध्ये 25, पंजाबमध्ये 13, हरियाणामध्ये 10, दिल्लीत 7, हिमाचल प्रदेशमध्ये 4, उत्तराखंडमध्ये 5 आणि जम्मू-काश्मीरमध्ये 5 जागा आहेत.


आणखी वाचा :


ABP C Voter survey : शिंदे-फडणवीस-अजित पवारांना 19 ते 21 जागा, उद्धव ठाकरे-पवारांना 26-28! लोकसभेपूर्वी सर्वात मोठा सर्व्हे