ABP C-Voter Survey : वर्ष 2022 च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पाडणार आहेत. या पाच राज्यातील निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजपपासून काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, एमआयएम आदींनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याशिवाय प्रादेशिक पक्षांनीदेखील निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. एबीपी न्यूजने सी-वोटरसह या पाच राज्यातील जनतेच्या कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
कोणत्या राज्यांमध्ये सत्ता कायम राहणार, कोणत्या राज्यात सत्तांतर होणा, आदी प्रश्नांबाबत जनतेच्या मनात काय आहे, हे या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
उत्तर प्रदेशमध्ये कोणाला किती जागा?
एकूण जागा- 403
भाजप+ : 213-221
समाजवादी+ : 152-160
बसपा : 16-20
काँग्रेस : 6-10
अन्य : 2-6
उत्तर प्रदेशात कोणाला किती टक्के मते?
एकूण जागा- 403
भाजप + : 41 टक्के
समाजवादी पक्ष + : 31 टक्के
बसपा : 15 टक्के
काँग्रेस : 9 टक्के
अन्य : 4 टक्के
पंजाबमध्ये सत्तांतर होणार का?
एकूण जागा 117
काँग्रेस : 35 टक्के मते
अकाली दल : 21 टक्के
आम आदमी पक्ष : 36 टक्के
भाजप : 2 टक्के
अन्य : 6 टक्के
पंजाबमध्ये किती जागा मिळतील ?
एकूण जागा : 117
काँग्रेस : 42-50
अकाली दल : 16-24
आम आदमी पक्ष : 47-53
भाजप : 0-1
अन्य : 0-1
उत्तराखंडमध्ये काय होणार?
एकूण जागा : 70
काँग्रेस : 36 टक्के मते
भाजप : 41 टक्के
आम आदमी पक्ष : 12 टक्के
अन्य : 11 टक्के
उत्तराखंडमध्ये कोणाला किती जागा?
एकूण जागा : 70
काँग्रेस : 30-34
भाजप : 36-40
आम आदमी पक्ष : 0-2
अन्य : 0-1
गोव्यात पुन्हा भाजप?
एकूण जागा: 40
काँग्रेस : 19 टक्के मते
भाजप : 36 टक्के
आम आदमी पक्ष : 24 टक्के
अन्य : 21 टक्के
गोव्याचा कल असा असणार?
भाजप : 19-23
काँग्रेस : 2-6
आप : 3-7
अन्य : 8-12
मणिपूरमध्ये कोणाला किती टक्के मते मिळतील ?
एकूण जागा- 60
भाजप-39%
काँग्रेस-33%
एनपीएफ-9%
अन्य-19%
मणिपूरमध्ये किती जागा मिळतील ?
एकूण जागा : 60
भाजप - 25-29
काँग्रेस- 20-24
एनपीएफ- 4-8
अन्य- 3-7