Abdul Kalam Death Anniversary : भारताचे 'मिसाईल मॅन' (Missile man Of India) आणि 'पीपल्स प्रेसिडेन्ट' (People's President) अशी ओळख असलेल्या महान वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दुल कलामांची आज पुण्यतिथी आहे. अवुल पाकीर जैनुलाउद्दीन अब्दुल कलाम असे त्यांचे पूर्ण नाव. ते भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून प्रसिद्ध होते. जीवनात परिस्थिती कोणतीही असो, पण जेव्हा तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार करता तेव्हा तुम्ही ती पूर्ण करत राहता असा त्यांनी संदेश दिला. अब्दुल कलाम मसूदी यांचे विचार आजही तरुण पिढीला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. अब्दुल कलाम यांचे हेच प्रेरणादायी विचार आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊयात.


अब्दुल कला यांचे 10 प्रेरणादायी विचार


1. स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात, तर खरे स्वप्न ते असतात जे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोपूच देत नाहीत.


2. तुमच्यावर येणाऱ्या कठीण प्रसंगांच्या मदतीनेच तुमचं आत्मबळ वाढवा आणि त्या प्रसंगांनाच तुमच्या यशाचा साथीदार बनवा.


3. कोणतेही ध्येय यशस्वीपणे गाठायचे असेल तर त्या ध्येयाशी तुमची कमालीची एकनिष्ठता असावी लागते. सगळे प्रयत्न त्या एकाच दिशेने वळवावे लागतात.


4. सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे 


5. आपल्या प्रत्येकाकडे समान बुद्धिमत्ता नसते पण ती विकसित करण्याची संधी मात्र सर्वांना समान मिळते. 


6. आयुष्य खडतर आहे त्याची सवय करून घ्या.


7. तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखं तळपायची तयारी ठेवा.


8. संयम हा यश मिळविण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे.


9. जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात तर तुम्ही प्रयत्न करणे थांबवू नका कारण Fail म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग असतो. 


10. यशस्वी होण्याची इच्छाशक्ती मजबूत असेल तर अपयश आपल्याला दबवू शकत नाही.


डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या कारकीर्दीत भारताला अनेकवेळा अभिमान वाटावा असे काम केले. भारताचे पहिले रॉकेट एसएलव्ही-3 आणि पीएसएलव्ही चा विकास करण्यात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. भारतीय लष्कराला शक्तीशाली बनवणाऱ्या 'पृथ्वी' आणि 'अग्नी' क्षेपणास्त्रांची निर्मिती त्यांच्या नेतृत्वाखाली झाली. जगाला भारताची ताकद दाखवणारा पोखरणचा स्फोट त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आला. त्यामुळे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या प्रत्येक कामगिरीने देशाची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचच झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Important Days in July 2023 : 'महाराष्ट्र कृषी दिन', 'गुरुपौर्णिमा', 'मोहरम'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी