'आप' खासदार भगवंत मान यांचं लोकसभेतून निलंबन
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2016 07:22 AM (IST)

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांचं लोकसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. मान यांनी स्वतःच्या घरापासून संसदेच्या आतपर्यंतचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता. संसदेची सुरक्षितता धोक्यात घातल्याच्या आरोपाअंतर्गत मान यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी भगवंत मान यांची चौकशी होईल. 9 सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करेल. समितीचा निर्णय येईपर्यंत भगवंत मान सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकत नाही, असं लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज सांगितलं. केवळ माफीने तोडगा निघणार नाही : महाजन सुमित्रा मान यांनी भगवंत मान यांना समन्स जारी केला होता. त्यानंतर मान मला भेटली. ते माफी मागण्यास तयार आहे. पण माफी मागून तोडगा निघू शकत नाही. प्रकरण गंभीर आहे. त्यावर कोणती कारवाई करायची याबाबत मी सगळ्यांशी बोलत आहे. जर हे सभागृहाच्या आत घडत असेल तर तातडीने कारवाई व्हायलाच हवी. या मुद्द्यावर सर्वच खासदार नाराज आहेत, असं महाजन यांनी सांगितलं.