BREAKING: पाकिस्तानमधील इस्लामाबाद शहरावर F-16 या विमानाच्या घिरट्या, पाकिस्तानचे पत्रकार हमीद मीर यांचा दावा

रत्नागिरीः चिपळूण, खेड परिसरात मुसळधार पाऊस, दापोली-खेड मार्गावरील वाहतूक ठप्प, खेड शहरातील बाजारपेठेत पुराचं पाणी वाढलं, चोरद नदीच्या पुराने 32 गावांचा संपर्क तुटला


हेडलाईन्स

भारताकडून ऑस्कर पुरस्कारसाठी तामीळ चित्रपट 'विसारानाई'चं नामांकन, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाकडून भारताला आशा

--------------------

नवी मुंबई महानगरपालिका येत्या काळात पाण्याचे दर वाढवणार, आयुक्त तुकाराम मुंढे यांचे संकेत

--------------------

शेतकऱ्यांच्या वीज थकबाकीची संपूर्ण वसुली करणार, पुरेसा पाऊस झाल्याने महावितरणचा निर्णय

--------------------

पुणे : चाकणमधील 2013 सालचं बलात्कार, हत्या प्रकरण : दोषी खलकसिंह पांचाळला फाशी, राजगुरुनगर न्यायालयाचा निर्णय

--------------------

कोल्हापुरातील मराठा मोर्चाला सीमाभागाचा पाठिंबा, 15 ऑक्टोबरच्या मोर्चात सीमावासीय सहभागी होणार

--------------------

पालघरमधील कुपोषणामुळे मुलांच्या मृत्यूप्रकरणी मानवाधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश

--------------------

2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: कर्नल पुरोहितच्या जामीन अर्जावर 26 सप्टेंबरला निर्णय

--------------------


मुंबई-नाशिक हायवेवरील खारेगाव टोलनाक्यावर 4 वाजेपर्यंत टोलमाफी, ट्रॅफिक जॅममुळे 2 किमी पायपीट केल्यानंतर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचे आदेश

 --------------------



शिळफाटा वाहतूक कोंडीचा आरोग्यमंत्र्यांना फटका, तीन तास ट्रॅफिकमध्ये अडकलेले डॉ. दीपक सावंत 2 किमी चालत निघाले

--------------------

मुंबई : छगन भुजबळांच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच, ताप अजून कायम, संधिवाताचाही त्रास, जे जे रुग्णालयात आज आणखी तपासण्या होणार

--------------------

पुणे : तृप्ती देसाई बिग बॉसमध्ये सहभागी होणार नाहीत, इतर कार्यक्रमांच्या तारखांमुळे 3 महिन्यांचा करार करणं शक्य नसल्याचं स्पष्टीकरण.  या पुढच्या सिझनला बिग बॉसला महिलेचा आवाज देण्याचा विचार करावा नाहीतर, अन्यथा कार्यक्रम उधळण्याचा इशारा

--------------------

ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी, गुजरातकडे जाणारा वर्सोवा पूल बंद झाल्याने रस्त्यांवर ताण, घोडबंदर रोड ते ठाणे टोल नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा, मुंबईला येणारी वाहतूक विस्कळीत

--------------------

1. मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाने झोडपलं, रस्त्यांवर पाणीच पाणी, रस्ते वाहतूक मंदावली, लोकलही विस्कळीत

--------------------

2. काश्मीरवर तोडगा निघेपर्यंत भारताशी समेट अशक्य, संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, दहशतवादी बुरहानचा काश्मिरी नेता असा उल्लेख

--------------------

3. उरीमध्ये काही तरी चुकलंच, दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांची अप्रत्यक्ष कबुली, तर पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताकडून सक्त ताकीद

--------------------

4. मराठा समाजाच्या प्रश्नावर लवकर भूमिका जाहीर करा, शिवसेना नेत्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी, तर अमरावतीत आज मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन

--------------------

5. भारत आणि न्यूझीलंडमधील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात, कानपूरमध्ये भारताचा 500वा कसोटी सामना रंगणार

--------------------

6. व्हॉट्सअॅपला तगडा स्पर्धक, गुगलचं ऍलो ऍप्लिकेशनचं लाँच, आयस्टोर आणि गुगलस्टोरवरुन डाऊनलोड करता येणार

--------------------

एबीपी माझा वेब टीम