शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर भाजपमध्ये प्रवेश करणार, आझम पानसरेंनंतर पिंपरी-चिंचवडमधील आणखी एक दिग्गज नेता भाजपमध्ये
------------------------
पारदर्शी अजेंड्याबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार: सूत्र
------------------------
एकनाथ खडसेंची चौकशी का नाही? पुण्यातील भोसरी येथील जमीन हस्तांतरण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल, राज्य सरकारने आठवड्याभराचा वेळ मागितला
------------------------
सोलापूर : प्रथम वर्ग न्यायालयाने आमदार रमेश कदम यांचा जामीन फेटाळला. रमेश कदम यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी जामीन अर्ज दाखल केला होता
------------------------
दैनिक दिव्य मराठी चे उस्मानाबाद येथील पत्रकार राम खटके यांचे निधन
------------------------
सातारा : अभिनेते सयाजी शिंदे यांनी माण तालुक्यात लावलेल्या हजारो झाडांची कत्तल! दुष्काळग्रस्त पांढरवाडी गावात गेल्या सहा महिन्यांपासून जगवलेली झाडे तोडली
------------------------
सोलापूर : मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक, काँग्रेसचा 77 जागांवर दावा तर राष्ट्रवादीसाठी 25 जागा सोडण्याची तयारी
------------------------
पिंपरी चिंचवडमधील युतीसाठी शिवसेना-भाजपची आज बैठक, स्थानिक पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचे विनायक राऊत अमोल कोल्हे,भाजपचे गिरीश बापट उपस्थित राहणार
------------------------
मुंबई : शीना बोरा हत्या : पीटर मुखर्जीपासून मला घटस्फोट हवा, अर्ज दाखल करण्यासाठी इंद्राणी मुखर्जीची कोर्टात धाव
------------------------
रोहा : तटकरे बंधूंसोबतची शरद पवारांची बैठक संपली, तटकरे कुटुंबातील वाद मिटल्याची पवारांची माहिती
------------------------
शीना बोरा हत्याकांड : इंद्राणी आणि पीटर मुखर्जी तसंच इंद्राणीचा अगोदरचा पती संजीव खन्ना यांच्यावर आरोपपत्र निश्चित, सर्वांवर खून आणि खुनाच्या कटाचे आरोप, 1 फेब्रुवारीपासून नियमित सुनावणी
------------------------
सांगली : घानवडी गावातील श्री यल्लम्मा देवीच्या मंदिरात चोरी, देवीचा मुकुट, अंगावरील दागिन्यांची चोरी, सीसीटीव्ही कॅमेराही लंपास
------------------------
1. आजपासून एटीएममधून दिवसाला 10 हजार रुपये काढता येणार, आरबीआयचा नागरिकांना मोठा दिलासा, मात्र आठवड्यात 24 हजार काढण्याची मर्यादा कायम
------------------------
2. मुंबई मनपा निवडणुकीत युतीच्या भवितव्याबद्दल खलबतं, आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा होणार, भाजप मिशन 115 साठी आग्रही
------------------------
3. मुंबईत राष्ट्रवादीला आघाडी नको होती, म्हणून उमेदवार जाहीर केले, अशोक चव्हाणांनी सुनावलं, राज्यात मात्र आघाडी करुन लढण्याची तयारी
------------------------
4. बाप-लेकाच्या भांडणात अखिलेश यादवांची सरशी, सायकल चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळालं, मुलायम सिंहांची अडचण
------------------------
5. 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार, अर्थमंत्री अरुण जेटलींची घोषणा, करप्रणाली सुलभ होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल
------------------------
6. इस्तंबुलमध्ये 39 जणांचे प्राण घेणारा क्रूरकर्मा पोलिसांच्या जाळ्यात, सीरियातल्या कारवाईचा बदला घेतल्याचं आयएसचं स्पष्टीकरण
------------------------
7. झायरा वसीम- मेहबुबा मुफ्तींच्या भेटीनं वाद, नेटीझन्सकडून टीका-टिपण्णी, ट्विटवरुन झायराचा माफीनामा
------------------------
8. नोटाबंदीनंतर देशातील 40 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या, असोचेमचा अहवाल, औरंगाबादेतही 50 हजार लोकांवर घरी बसण्याची वेळ, माझाचा एक्स्क्लुझिव रिपोर्ट
------------------------
एबीपी माझा वेब टीम