पाकिस्तान: लाहोरमधील मॉल रोड येथे जोरदार स्फोट, स्फोटात पोलीस अधिकाऱ्यासह 7 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी असल्याचं वृत्त
--------------------------------
बीड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यातील 16 आरोपींना जामीन मंजूर, 7 फेब्रुवारी रोजी सर्व आरोपींना न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती
--------------------------------
BREAKING : नागपूर : अशोक चव्हाणांवर शाईफेक प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल, अद्याप कुणालाही अटक नाही
हेडलाईन्स:
--------------------------------
1. देशाला 56 इंचाची छाती हवी, मनमोहन सिंहांचं मौन नको, अंधेरीतल्या सभेत मुख्यमंत्र्यांचा प्रहार, तर सैनिकांच्या अवस्थेचे अपश्रेयही घ्या, उद्धव यांचा सल्ला
--------------------------------
2. एकमेकांवर टीका करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, दिव्यातील सभेत शरद पवारांचे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांवर ताशेरे
--------------------------------
3. उद्यापासून राज ठाकरे प्रचाराच्या रिंगणात, मुंबईत तीन सभा, तर ठाणे, नाशिक आणि पुण्यातही प्रचार करणार, उद्योगपती रतन टाटांकडून राज ठाकरेंना शुभेच्छा
--------------------------------
4. असदुद्दीन ओवेसींच्या रॅलीला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली, ओवेसींच्या जीविताला धोका असल्याचं कारण, तर विरोध झुगारून रॅली करण्याचा एमआयएमचा निर्धार
--------------------------------
5. काश्मीरमध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा, कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरामध्ये चकमक सुरुच, दहशतवाद्यांशी लढताना दोन जवान शहीद
--------------------------------
6. हैदराबाद कसोटी जिंकण्यासाठी बांगलादेशला अजूनही 356 धावांची गरज; भारतासमोर विजयासाठी सात विकेट्सचं आव्हान
--------------------------------
एबीपी माझा वेब टीम