हेडलाईन्स

 

संपूर्ण मुंबईत 36 तासांसाठी 25 टक्के पाणी कपात, तानसा धरणाच्या दुरुस्तीच्या कामामुळे 10 आणि 11 मे रोजी पाणी कपात

 

नागपूर : रामटेकमधील सलाका बोर्डा गावात 8 वर्षीय चिमुकल्याला ट्रकने चिरडले, चिमुकल्याचा जागीच मृत्यू, संतप्त गावकऱ्यांनी 6 ट्रक जाळले, गावात मोठा पोलिस बंदोबस्त

 

 

दूध महासंघाकडून दूध खरेदी दरात वाढ, महानंद दुग्ध शाळेच्या अध्यक्षांचा निर्णय,  7 मेपासून गाय दूध खरेदी दरात वाढ, शासन दरापेक्षा 1.50 रुपये प्रति लिटर वाढ,राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे निर्णय

 

स्वराज महिला संघटनेच्या महिलांचा हाजी अली दर्ग्यात प्रवेशाचा प्रयत्न, महिला पोलिसांच्या ताब्यात

 

BREAKING NEWS! केबीसी घोटाळ्याचा सुत्रधार भाऊसाहेब चव्हाणला सिंगापूरहून भारतात परतताना मुंबई विमानतळावर अटक

---------------------

1. गोवंडीच्या भीमवाडीत झोपडपट्टीला लागलेली आग आटोक्यात, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या आणि 8 वॉटर टँकर्सच्या मदतीने आगीवर नियंत्रण, सिलेंडर स्फोटामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

---------------

2. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरप्रकरणी काँग्रेसचा आज संसदेवर भव्य मोर्चा, तर संरक्षणमंत्री पर्रिकरांचं आज लोकसभेत निवेदन

---------------

3. नीट परीक्षेचा तिढा कायम, आज पुन्हा सुनावणी, तर 24 जुलैची नीट रद्द करुन 2018 पासून लागू करण्याची राज्य सरकारची मागणी

---------------

4. बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपींना अटक का होत नाही?, औरंगाबाद खंडपीठाचा सवाल, तर कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढल्याचं धनंजय मुंडेंचं वक्तव्य

---------------

5. छगन भुजबळांचे सीए सुनील नाईक माफीचे साक्षीदार होण्यास तयार, कोर्टात ईडीची माहिती, भुजबळांचा पाय आणखी खोलात

---------------

6. राज्यातल्या दुष्काळी भागातली ग्राऊंड रिअॅलिटी सरकारला माहित नाही, लोकसभेत अशोक चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल.

---------------

7. आयआरसीटीसी वेबसाईट हॅकिंगवरुन संभ्रम, केंद्राने डेटा चोरीचं वृत्त नाकारलं, तर गृहसचिव के.पी.बक्षींची मात्र हॅकिंग झाल्याची माहिती

---------------

8. आर्थिक समस्येमुळे बोरीवलीत व्यापाऱ्याची पत्नीसह आत्महत्या, कोणालाही जबाबदार धरु नका, सुसाईड नोटमध्ये उल्लेख

---------------

9. सलग दुसऱ्या आठवड्यातही तिकीटबारीवर 'सैराट' सुसाट, राज्यातील सर्व सिनेमागृहात शो हाऊस फुल

एबीपी माझा वेब टीम