हेडलाईन्स


नोटाबंदीनंतर तब्बल 4.7 लाख कोटींची बेहिशेबी रक्कम बँक खात्यात जमा करणाऱ्या 18 लाखपैकी 13 लाख जणांना नोटीसा ईमेल आणि एसएमएसद्वारे पाठवण्यात आल्या : अध्यक्ष, सीबीडीटी

-------------

एअरसेल-मॅक्सिस घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेल्या माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन यांच्यासह सर्वजण विशेष सीबीआय कोर्टाकडून दोषमुक्त

-------------

नोटाबंदीनंतर डिजीटल व्यवहाराबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्राने 94 कोटी रूपये खर्च केले - केंद्र सरकार

-------------

नोटाबंदीनंतर 18 लाख लोकांनी एकूण 4.7 लाख कोटी रूपयांची बेहिशेबी रक्कम बँक खात्यात जमा केली : अध्यक्ष, सीबीडीटी

-------------

मुंबई: वडाळ्यात शिवसैनिकांची निदर्शनं, माधुरी मांजरेकर समर्थक रस्त्यावर,अमेय घोलेंना वॉर्ड क्रमांक 178 मधून उमेदवारी

-------------

मुंबई : जुहूमध्ये कामत-निरुपम गटात वाद, मिलेनियम क्लबमध्ये दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची

--------------

मुंबई : लालबाग-परळमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, नाना अंबोले भाजपमध्ये जाणार, नाना आंबोले 2 टर्म शिवसेनेकडून नगरसेवक

--------------

मुंबई : स्थानिक शिवसैनिक, शाखाप्रमुखांचा विरोध डावलून वॉर्ड क्र. 199 मधून शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकरांना उमेदवारी, उद्या अर्ज भरणार

--------------

मुंबई : वार्ड क्र.1 मधून अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांना तर वॉर्ड क्र. 8 मधून दीपा पाटील यांना उमेदवारी निश्चित, वॉर्ड क्र. 1 आणि 8 च्या वादावर 'मातोश्री'तून पडदा

--------------


मुंबई माजी महापौर शुभा राऊळ महापालिका निवडणूक लढणार नाहीत, घोसाळकरांसोबतच्या वादानंतर माघार घेतल्याची चर्चा, इतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी निर्णय घेतल्याचं शुभा राऊळ यांचं स्पष्टीकरण 

--------------



मुंबई महानगरपालिका निवडणूक: शिवसेना विभागप्रमुखांच्या माध्यमातून जवळपास 150 एबी फॉर्मचे वाटप: सूत्र


--------------

1. तीन लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार, तर 5 ते 10 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील करात पाच टक्के सूट, 50 लाखावरील उत्पन्नावर 10 टक्के सरचार्ज कायम
--------------
2. आता पासपोर्ट मुख्य पोस्टातही मिळणार, नागरिकांच्या सोईसाठी मोठी घोषणा, रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगवरचा सेवा करही माफ

--------------
3. अरुण जेटलींच्या बजेटमध्ये राजकीय पक्षांवर सर्जिकल स्ट्राईक, दोन हजारावरची देणगी रोखीत स्वीकारण्यावर बंदी, काँग्रेस आणि इतर पक्षांकडून स्वागत

--------------
4. शिवसेनेसोबत युतीचा विषय संपला, आता स्वबळावर लढाई, मुंबईतील मनसैनिकांच्या मेळाव्यात राज ठाकरेंची घोषणा

--------------
5. मुंबई महापालिका सर्वात पारदर्शी आणि कार्यक्षम, आर्थिक सर्वेक्षण पाहणीचा अहवाल, मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते तोंडघशी

--------------
6. नागपुरात दिवसाढवळ्या व्यापाऱ्याची हत्या, कुशल कुहिंकेंचं शीर धडावेगळं करुन मारेकरी फरार, नातेवाईकांचा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आक्रोश

--------------
7. यजुर्वेंद्र चहलच्या फिरकीने बंगळुरुमधील टी-20 सामन्यात टीम इंडियाची इंग्लंडवर मात, मालिकाही खिशात

--------------
8. बंगळुरुतील बान्नेरघाट पार्कमधील सफारी कारला सिंहांचा घेराव, सिंहाचा गाडीवर चढण्याचा प्रयत्न, थरार कॅमेऱअयात कैद

--------------

एबीपी माझा वेब टीम