छगन भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याबद्दल जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने दोषी, पीएमएलए कोर्टाचा निर्णय
----------------------------------------------
पिंपरी-चिंचवडमध्ये सेना युतीसाठी सकारात्मक, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव आणि श्रीरंग बारणेंची माहिती, भाजपही हेवेदावे मागे ठेवणार भाजप खासदार अमर साबळे यांची प्रतिक्रिया
-----------------------------------------
हेडलाईन्स:
राज्यभरात आघाडी झाली तरी मुंबईत राष्ट्रवादीसोबत आघाडी होणार नाही: संजय निरुपम
युतीच्या चर्चेसाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावली शिवसेना मंत्र्यांची बैठक
-----------------------
1. मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीतील आग तब्बल 12 तासांनी आटोक्यात, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
2. युती होणार असेल तर फक्त पारदर्शकतेच्या अजेंड्यावर, ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला ठणकावलं, तावडे, शेलार आणि प्रकाश मेहता भाजपकडून चर्चा करणार
3. खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर आणि डायरीवर गांधींच्या जागी मोदींचं छायाचित्र, पंतप्रधान मोदींवर सोशल मीडियावर टीकेची झोड
4. टीसीएसचे सीईओ आणि फोटोग्राफर, संगीताचे चाहते, मॅरेथॉन रनर चंद्रशेखरन हे टाटा समूहाचे नवे अध्यक्ष, सायरस मिस्त्रींच्या हकालपट्टीनंतर टाटा ग्रुपचा निर्णय
5. सुट्टी न मिळाल्यानं सीआयएसएफ जवानाचा गोळीबार, 4 जवानांचा मृत्यू, बिहारच्या औरंगाबादमधील धक्कादायक घटना
6. नोटाबंदीचा राज्याच्या तिजोरीला मोठा फटका, 8 महिन्यांत महत्त्वांच्या करांची फक्त 40 टक्के वसुली, उर्वरित वसुलीसाठी फक्त 3 महिन्यांचा कालावधी
7. पुढील सहा महिन्यांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशिष शेलार; पवार आणि वेंगसरकरांच्या राजीनाम्यानंतर शेलारांवर धुरा