नवी दिल्ली : रेल्वे तिकिटांवर मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं होण्याची शक्यता आहे. येत्या अर्थसंकल्पात यासंबंधीची घोषणा होऊ शकते. याआधी व्होटर आयडी दाखवूनही या सवलती मिळू शकत होत्या. आता मात्र आधार कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे.

या सक्तीमुळे योग्य लाभार्थ्यांनाच सवलत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे दिव्यातल्या ट्रॅकवर टाकलेल्या रुळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते हावडा या संपूर्ण रेल्वेमार्गावर कुंपण टाकण्यात येईल, अशी माहिती आहे.

या कुंपणामुळे सुरक्षिततेबरोबरच वेगातही कमालीची वाढ होईल. ताशी 160 किलोमीटरवरुन हा वेग 200 किलोमीटरपर्यंत वाढवता येणार आहे. यंदा सर्वसामान्य अर्थसंकल्पातच रेल्वेचा अर्थसंकल्प मांडण्यात येईल. तेव्हा या घोषणांची शक्यता वर्तवली जात आहे.