Aadhaar Card History : आधार कार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी याचा वापर केला जातो. सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ते मालमत्ता खरेदी करणे, बँक खाते उघडणे, आयटीआर भरणे इत्यादी सर्व आवश्यक गोष्टींसाठी आधार कार्ड म्हत्वाचे आहे. आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) या सरकारी संस्थेद्वारे जारी केले जाते. आधार कार्डच्या वाढत्या उपयुक्ततेसोबतच त्यासंबंधीच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे.


अनेक वेळा आपण आपला आधार कार्डचा तपशील कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करत असोत. त्यामुळे तुमच्या आधारद्वारे फसवणुकीच्या अनेक घटना घडत आहेत. आधार कार्डचा गैरवापर झाला आहे का? हे जाणून घ्यायचे असेल तर  आधारची हिस्ट्री वेळोवेळी तपासणे खूप महत्वाचे आहे. हिस्ट्री तपासल्यानंतर तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे हे कळू शकेल. 


आधारची हिस्ट्री तपासण्याची प्रक्रिया 
1. UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/  वर क्लिक करा.


2. येथे My Aadhaar पर्यायावर क्लिक करून Aadhaar Services चा पर्याय निवडा.


3. पुढे आधार हिस्ट्री हा पर्या निवडा.


4. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल, ज्यामध्ये 12 क्रमांकाचा आधार क्रमांक टाका.


5. पुढे कॅप्चा कोड टाका. 


6. यानंतर OTP जनरेट होईल, तो ओटीपी टाका. 


7. यानंतर तुम्हाला हवा असलेला कालावधी निवडा 


8. यानंतर, तुम्हाला एकाच वेळी एकूण 50 आधार व्यवहारांची माहिती मिळेल.


9. तुमच्या आधारचा गैरवापर झाला आहे की नाही हे तुम्ही आधारच्या हिस्ट्रीत तपासू शकता.


तुम्हाला आधार कार्डच्या हिस्ट्रीत चुकीच्या व्यवहाराची माहिती मिळाली तर तुम्हाला लवकरात लवकर तक्रार नोंदवावी लागेल. यासाठी तुम्ही UIDAI च्या टोल फ्री नंबर - 1947 वर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. याशिवाय तुम्ही help@uidai.gov.in  वर मेल करून तुमची तक्रार नोंदवू शकता.