Aadhaar Card Update : आधार कार्ड हा सर्वत्र वापरला जाणारा दस्ताऐवज आहे. अगदी शाळेत प्रवेश घेण्यापासून ते बँक खाते उघडण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जात आहे. त्यामुळे आधार कार्डला खूपच महत्व आहे. शिवाय आपल्या ओळखीचा ग्राह्य धरला जाणारा सर्वात मोठा पुरावा म्हणजे आधार कार्ड आहे. त्यामुळे असा महत्वाचा दस्ताऐवज म्हणजे आधार कार्ड अपडेट ठेवणे खूप गरजेचे आहे. आधार कार्ड अपडेट न केल्यामुळे तुमची महत्त्वाची अेक कामे  थांबू शकतात. परंतु, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हणजेच यूआयडीएआयने (UIDAI) खूप मोठी सुविधा उपलब्ध करून दिलीय. तुम्ही यूआयडीएआयकडे तात्काळ तक्रार देऊ शकता.

  


तुमच्या आधार कार्डमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास किंवा कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास तुम्ही हे काम सहज करू शकता. UIDAI ने तुम्ही तक्रार कशी नोंदवू शकता याची माहिती दिली आहे. कोणत्याही अडचणीशिवाय तुम्ही  यूआयडीएआयकडे तुमची तक्रार दाखल करू शकता. 


Aadhaar Card Update : कुठे करता येणार तक्रार? 


UIDAI ने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. ऑनलाइन तक्रार दाखल करण्याच्या पोर्टलद्वारे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत तक्रार नोंदवू शकता. याचे उत्तर तुम्हाला दोन भाषांमध्ये दिले आहे. येथे आधार वापरकर्ते त्यांचा फीडबॅकही शेअर करू शकतात. myAadhaar.uidai.gov.in या लिंकवर जाऊन तक्रार नोंदवता येईल.   


Aadhaar Card Update : तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 


UIDAI कडून तक्रार दाखल करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1947 जारी करण्यात आला आहे. या नंबरवर कॉल करून किंवा मेसेज करून तुम्ही तुमची आधार स्थिती, अपडेट्स आणि इतर गोष्टींची माहिती मिळवू शकता. तसेच तुम्ही आधार पीव्हीसी कार्ड, तक्रारीची स्थिती, जवळच्या आधार केंद्राविषयी माहिती मिळवू शकता. 


Aadhaar Card Update : मेलद्वारेही तक्रार करा  


आधार कार्डविषयी तुमची इतर कोणतीही तक्रार असेल तर तुम्ही मेलद्वारेही तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला तुमची तक्रार help@uidai.gov.in वर पाठवावी लागेल. मेलसोबतच तुम्हाला तुमची तक्रार आधार कार्डची माहिती आणि तुमच्याबद्दलची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. तुमच्या तक्रारीच्या आधारे तुम्हाला संपूर्ण तपशील दिला जाईल आणि तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल. 


महत्वाच्या बातम्या


Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा अनधिकृत वापर होऊ शकतो, 'अशी' घ्या काळजी