Noida News : नोएडामध्ये (Noida) सातत्यान सुरक्षा रक्षकांना (security guard) मारहाण झाल्याच्या किंवा त्यांच्याशी चुकीचं वर्तन केल्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी देखील अशीच एक सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. आपलं कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा रक्षकाला एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या महिलेनं मारहाण केली आहे. तसेच या सुरक्षा रक्षकाची टोपी देखील महिलेनं फेकून दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नोएडातील अजनारा होम्स सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे


गाडीवर सोसायटीचे स्टिकर नसल्यानं गार्डने आत जाण्यापासून रोखलं


सरुक्षा रक्षकाला महिलेनं केलेल्या मारहाणीनंतर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर फेज थ्री कोतवाली पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. सेक्टर-121 येथील अजनारा होम्स सोसायटीतील अंजली तिवारी, दीक्षा तिवारी आणि काकुल अहमद या तीन मुली शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत सोसायटीत पोहोचल्या. ज्या गाडीतून या तिघी तिथे आल्या होत्या, त्या गाडीवर सोसायटीचे स्टिकर नसल्यानं गार्डने या तिघींना आत जाण्यापासून रोखले होते. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या महिलेनं सुरक्षा रक्षकाची कॉलर पकडून मारहाण केल्याची घटना घडली आहे. 


 






दोन महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात


दरम्यान, दुसऱ्या एका गार्डने या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. सुमारे अर्धा तास सोसायटीत हायव्होल्टेज ड्रामा सुरु होता. आवाज ऐकून सोसायटीतील इतर लोकही यावेळी जमा झाले होते. लोक आल्यानंतर तिघीही तिथून निघून गेल्या.  त्यानंतर या प्रकरणाची सुरक्षा रक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर कोतवाली पोलिसांनी अंजली आणि काकुल या दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या महिलेचा शोध सुरु आहे. अंजली आणि दीक्षा या बहिणी आहेत. तर काकुल या दोघींची मैत्रिण आहे. गार्डनं केलेल्या तक्रारीवरून तीनपैकी दोन मुलींवर कारवाई करण्यात आली. आणखी एकीचा शोध सुरु आहे. 




लोकांनी केली कारवाईची मागणी केली


या घटनेचा व्हिडिओ शनिवारी संध्याकाळी सगळीकडे व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी यासंबंधी पोलिस आयुक्तांना टॅग करत मुलींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओची त्वरित दखल घेत कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी फेज थ्री कोतवाली भागातील क्लियो काउंटीमध्ये एका महिला प्राध्यापकाने गार्डला मारहाण केल्याची घटना देखील घडली होती. त्यानंतर आता पुन्हा गार्डला मारहाण केल्याची घटना घडली आहे.