जम्मू काश्मीर : देशभरात भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या (Independance day) सेलिब्रेशनचा उत्साह दिसत असून सर्वत्र तिरंग्यातील रोषणाई दिसून येत आहे. देशभक्तीची गाणी, तिरंग्यात सजलेली ऐतिहासिक ठिकाणं दिसून येत आहे. सोशल मीडियावरही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दिसून येत असतानाच, जम्मू काश्मीरमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या दोडा येथील पटनीटॉप जंगलात दहशतवाद्यांशी (Terrorist) लढताना भारतीय सैन्याच्या कॅप्टनला वीरमरण प्राप्त झाले आहे. सैन्य दलाच्या पथकाने या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचीही माहिती आहे. कॅप्टन दीपक (Indian army) हे आपल्या पथकाच्या नेतृत्वात या दहशतवाद्यांशी लढत असताना दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतामातेनं आपला पुत्र गमावला आहे. दहशवाद्यांशी गोळी लागल्यानंतरही कॅप्टन दीपक (Martyr) त्यांचा सामना करत होते.
भारतीय सैन्याचे जवान आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत गोळी लागल्यानंतर कॅप्टन दीपक यांना त्यांच्या पथकाने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पटनीटॉप जंगलातील अकर क्षेत्रातील एका नदीकिनारी लपलेल्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला. बुधवारी सकाळी एन्काऊंटर करण्यात येत असलेल्या जागेवर आपली शस्त्र टाकून दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. घटनास्थळावरुन अमेरिका एम 4 रायफलही जप्त करण्यात आली असून तीन बॅगेतून स्फोटकेही जप्त करण्यात आली होती. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्ली दहशवाद्यांच्या घटनांवरुन बैठका सुरू असून गुप्तचर यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गुप्तचर माहितीचा हवाला देऊन एका सूत्रानं सांगितलं की, "जम्मू आणि काश्मीरमधील कठुआच्या सीमेवर असलेल्या एका गावात अलीकडेच शस्त्रांसह दोन अज्ञात व्यक्तींच्या हालचाली आढळून आल्या आहेत. ते जवळच्या पठाणकोट शहराकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही." सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "1 जून रोजी स्फोटकं/आयईडीची खेप जम्मू शहराच्या अंतरावर पोहोचली. या स्फोटकांचा वापर आगामी काळात सुरक्षा आस्थापना, कॅम्प, वाहनं किंवा महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो."
दहशदवाद्यांच्या निशाण्यावर प्रार्थनास्थळे
गुप्तचर सूत्रांनी उघड केलं आहे की, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरच्या लगतच्या भागांत कार्यरत असलेल्या गुंड, कट्टरपंथी आणि दहशतवाद्यांचा आयएसआय प्रायोजित संबंध स्वातंत्र्यदिन आणि सध्या सुरू असलेली अमरनाथ यात्रा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत होता. गुप्तचर विभागाच्या सतर्कतेनुसार, "15 ऑगस्टच्या आसपास मोठ्या संख्येनं लोकांना लक्ष्य करण्यासाठी तयार केलेल्या IEDs चा वापर केला जाऊ शकतो. यासोबतच सरकारच्या काही निर्णयांवर किंवा कृतींबाबत असंतुष्ट घटकांकडून सूडबुद्धीची कारवाई होण्याची शक्यता असल्यानं धोका आणखी वाढला आहे."
दिल्लीत उच्चस्तरीय बैठक, यंत्रणा अलर्ट
दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली . बांगलादेशातील परिस्थिती बघता दिल्ली NCR मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बैठकीत चर्चा झाली. यानंतर दिल्ली पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. बांगलादेशात सध्या गृहयुद्ध भडकलं आहे. अनेक बांगलादेशी नागरिक भारताच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील परिस्थिती बघता दिल्ली एनसीआरमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बैठकीत चर्चा झाली. यानंतर दिल्ली पोलिसांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले.