नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत (Delhi) एका शालेय मुलाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा प्रकार केल्याचं उघडकीस आलं आहे. दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलाशमधील सॉमरफील्ड स्कूलमध्ये बॉम्ब (Bomb) ठेवल्याची धमकी एका ईमेलद्वारे मिळाली होती. या ईमेलनंतर स्कुल प्रशासनाने पोलिसांना संपर्क केल्यानंतर पोलिसानी तपासाची चक्रे फिरवले. त्यामध्ये, 14 वर्षीय शाळकरी मुलानेच हा ईमेल पाठवल्याचे समोर आले आहे. शाळेत (School) जाण्याची इच्छा नसल्यानेच या विद्यार्थ्याने हा प्रताप केल्याचंही तपास उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे बॉम्बस्कॉडसह पोलिसांनी शाळेत (School) पोहोचताच शाळेतील सर्वच वर्ग रिकामे करुन विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले होते. 


दक्षिण दिल्लीतील सॉमरफील्ड स्कूलमध्ये धमकी देणारा ई-मेल शाळेला प्राप्त झाला होता. त्यानुसार, येथील शाळेत बॉम्ब ठेवल्याचं मेलमद्ये नमूद करण्यात आलं होतं. मध्यरात्री 12.30 वाजता हा ईमेल आल्यामुळे शाळेतील प्रशासनाने सकाळी हा ई-मेल पाहताच तात्काळ दखल घेत, पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांकडून सायबर टीमच्या मदतीने ह्या ईमेलला हॅक करण्यात आले. याशिवाय, बॉम्बस्कॉडसह शाळे धाव घेत पोलिसांनी शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना बाहेरही काढलं होतं. त्यानंतर, पोलीस ठाण्यात एफआयआर नोंद करुन तपासही सुरु केला. त्यानुसार, तपासात शाळेतील विद्यार्थ्यानेच हा इमेल पाठवल्याचे समोर आले. 


पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या अधिक तपासावर जोर दिला, त्यामध्ये धमकीचा ईमेल करणारा मुलगा 14 वर्षीय असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याची कसून चौकशी केली असता, शाळेत जाण्याचं मन नव्हतं, म्हणून मी तो ईमेल केल्याचं विद्यार्थ्याने सांगितलं. विशेष म्हणजे त्या मेलमध्ये इतरही दोन शाळांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. कारण, हा ईमेल खरा वाटावा, बनावट वाटू नये म्हणून या विद्यार्थ्याने चक्क 2 इतर शाळांचाही उल्लेख केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे. 


दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांकडून अशाप्रकारची घटना घडत असल्याने ही चिंतेची बाब असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तसेच, पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांच्यावर योग्य ते संस्कार करणे हेच यासाठी उपाय असल्याचंही काही जाणकारांचं म्हणणं आहे.  


हेही वाचा


राज्यात राजकीय घडामोडींना वेग; शरद पवार घेणार एकनाथ शिंदेंची भेट,आठवड्याभरात दुसरी भेट


 राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा?