बडोद्यात 91 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन
एबीपी माझा वेब टीम | 16 Feb 2018 08:37 AM (IST)
संमेलनाच्या पूर्वसंध्येला संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आलं.
बडोदा, गुजरात : साहित्यरसिक ज्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात, तो सारस्वतांचा मेळा आजपासून सुरु होत आहे. गुजरातमधील बडोद्यात 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. दुपारी 4 वाजता संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला बडोद्यात ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आलं. राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड संमेलनाच्या स्वागताध्यक्षा आहेत. बडोद्याच्या राजवाड्यापासून साहित्य संमेलनाच्या आवारापर्यंत ग्रंथदिंडी निघाली. यावेळी शहरातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने हजर होते. साहित्य संमेलन पहिल्या दिवसाचे कार्यक्रम : सकाळी 10 वाजता : ध्वजारोहण सकाळी 10.15 वाजता : पु. आ. चित्रे अभिरुची ग्रंथप्रदर्शन सकाळी 10.30 वाजता : महाराजा सयाजी गायकवाड समग्र चरित्रसाधने खंडाचे प्रकाशन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित रहाणार दुपारी 4 वाजता : संमेलनाचे औपचारिक उद्घाटन, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, उद्घाटक डॉ. रघुवारी चौधरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहतील. संध्याकाळी 7.15 वाजता : कवीकट्टा उद्घाटन संध्याकाळी 7.30 वाजता : मराठी भाषासुंदरी सादरीकरण