भोपाळ : घर, दुकानं किंवा बँकांमधून पैसे चोरीच्या अऩेक घटना घडतात, मात्र मध्यप्रदेशातल्या देवासमध्ये चक्क नोटांच्या छपाई कारखान्यातूनच लाखोंची चोरी झाल्याचं उघडकीस आलं आहे. गेल्या 3 महिन्यांपासून तब्बल 90 लाखांची चोरी करण्यात आली आहे.


मागच्या 3 महिन्यांपासून नोटांच्या छपाई कारखान्यात अधिकारीपदावर असणाऱ्या पोलीस निरीक्षकानंच नोटांची बंडलं लांबवण्याचा उद्योग सुरु केला होता. आपल्या बुटामध्ये पाचशे-पाचशे रुपयांची बंडलं लपवून त्याने हा काळाबाजार सुरु केला. मनोहर वर्मा असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्यानं त्याची तपासणी होत नव्हती, याचाच फायदा घेऊन मागच्या 3 महिन्यात मनोहर वर्मानं तब्बल 90 लाख रुपये चोरल्याची माहिती आहे. काल शुक्रवारी त्याला रंगेहाथ पकडलं गेलं. नोटांची पडताळणी करुन त्या कायम ठेवणं किंवा त्यांना रद्द करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर होती.