चंदीगड : पंजाबमध्ये एका टॅक्सी ड्रायव्हरच्या बँक खात्यात तब्बल 9 हजार 800 कोटी रुपये अचानक जमा झाले आहेत. बर्नाळाच्या स्टेट बँक ऑफ पटियालाच्या ब्रांचने चुकून ही गलेलठ्ठ रक्कम हरपाल सिंह यांच्या खात्यात जमा केली आहे.
मात्र घोडचुकीची जाणीव होताच तात्काळ दुसऱ्या दिवशी ही रक्कम पुन्हा काढून घेण्यात आली. यावर स्पष्टीकरण देताना स्टेट बँक ऑफ पटियालाच्या अधिकाऱ्यांच्या नाकी दम आला आहे.
आयकर विभागाकडून चौकशी सुरु
इन्कम टॅक्स विभागाने हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं असून याप्रकरणी चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे नजरचुकीने रक्कम जमा झालेलं हरपाल सिंहचं हे जनधन खांतं होतं.
त्यामुळे हरपाल सिंह यांना 1 दिवसाच्या रक्कमेवरचं व्याज मिळणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण या रक्कमेचं एका दिवसाचं व्याज तब्बल 4 कोटी इतकं आहे.