नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये सीमा भागात होणारी एखादी चकमक ही काही नवी बाब नाही. पण, सध्या भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका 8 वर्षीय पाकिस्तानी मुलाने राजस्थान येथील बारमेर सीमा ओलांडली. यानंतर भारतीय सीमा सुरक्षा दलातील जवानांनी या मुलाला सुखरुप पाकिस्तानच्या जवानांच्या ताब्यात दिलं.
Nagarparker या भागातील असणाऱ्या या मुलाला सैन्यानं पाकिस्तानी जवानांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्याला खाऊपिऊ घालून त्याची योग्य ती काळजीही घेतली होती.
Jammu Kashmir | अहो आश्चर्यम्! जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची कमान तयार
सीमा सुरक्षा दलातील गुजरात फ्रंटियरमध्ये सेवेत असणाऱ्या उप निरिक्षक एम.एल. गर्ग यांनी 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या माहितीनुसार चुकून इथं आलेला तो मुलगा रडू लागला होता. ज्यानंतर बीएसएफच्या जवानांनी त्याला चॉकलेट आणि काही खाऊही दिला.
सूत्रांच्या माहितीनुसार करिम हा सायंळी 5 वाजण्याच्या सुमारास भारतीय सीमेत आला होता. सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानच्या सीमेतून भारतीय हद्दीत प्रवेश करणाऱ्या या मुलाचे फोटो आणि त्याच्यासोबत घ़डलेल्या प्रसंगाची बरीच चर्चा सुरु आहे.
दरम्यान, Gemararam Meghwal हा मुळचा बारमेर येथील असणारा 19 वर्षीय मुलगा चुकून पाकिस्तानच्या हद्दीत शिरला. मागील वर्षी 4 नोव्हेंबरला ही घटना घडली होती. तेव्हापासून हा मुलगा पाकिस्ताममध्येच आहे. पाकिस्तान रेंजर्सनं त्याला पकडलं असून, सध्या तो पाकिस्तानमधील सिंध पोलिसांच्या ताब्यात आहे. सध्या त्याला परत आणण्याचेच प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वीही अनेकदा अनावधानानं सीमा ओलांडून शेजारी राष्ट्राती भारतातून काहीजण गेले आहेत, जे मायदेशी परतण्यासाठी एकतर संघर्ष करत आहेत किंवा मग मायदेशी परतण्यापूर्वी त्याना पाकिस्तानकडून ताब्यात घेतलं जात आहे.