काश्मीरचं खोरं पुन्हा धुमसलं, आतापर्यंत 8 अतिरेक्यांना कंठस्नान
एबीपी माझा वेब टीम | 24 Jun 2016 04:19 AM (IST)
कुपवाडा (काश्मीर): काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या दोन चकमकीत 8 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. दोबवान वन परिक्षेत्रात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. ही माहिती मिळताच लष्कराच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं. या सर्च ऑपरेशन दरम्यान जवानांनी लोलाब परिसरात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. तर दुसरीकडे दृगमुल्ला परिसरात झालेल्या दुसऱ्या चकमकीत आणखी 3 दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं आहे. तर दृगमुल्ला परिसरात आणखी एक दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं असून सध्या अधूनमधून गोळीबार सुरु आहे. तसंच सर्च ऑपरेशन सुरु आहे.