भोपाळ (मध्य प्रदेश) : भोपाळमधील सेंट्रल जेलमधून सिमीच्या 8 दहशतवाद्यांनी पलायन केले. चादरीची रस्सी बनवून रात्री साडेतीनच्या सुमारास जेलची भिंत ओलांडून दहशतवादी पळाले.

सिमीशी संबंधित 8 दहशतवाद्यांनी भोपाळमधील सेंट्रल जेलमधून पलायन केले. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकाची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर चादरीच्या साहाय्याने जेलची भिंत ओलांडून फरार झाले.

भोपाळ जेलमध्ये याआधी अशाप्रकारे गुन्हेगारांच्या पलायनाची घटना कधीही घडली नव्हती. दहशतवाद्यांच्या पलायनाच्या घटनेनंतर संपूर्ण शहरभर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाही तातडीने सेंट्रल जेलमध्ये पोहोचले असून, तपासही सुरु करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी भोपाळ सेंट्रल जेलच्या अधीक्षकांसोबत चार जणांना निलंबित करण्यात आले आहे.

सिमी : स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया

सिमी (Students Islamic Movement of India) ही दहशतवादी संघटना आहे. 25 एप्रिल 1977 रोजी अलिगढमध्ये 'सिमी'ची स्थापना झाली. 2001 साली सरकारने या संघटनेवर बंदी आणली. आतापर्यंत मध्यप्रदेशातून सिमीचे सर्वात जास्त दहशतवादी अटक करण्यात आले आहेत.