Google Doodle : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वातंत्र्याचा (Independence Day 2022) अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, गुगलनेही (Google) हा दिवस खास पद्धतीने साजरा केला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलने अनोखे डूडल (Doodle) बनवले आहे. यामध्ये रंगीबेरंगी पतंग उडवताना दाखवण्यात आले आहेत. हे पतंग भारताने आतापर्यंत मिळवलेल्या यशाच्या उंचीचे प्रतीक दर्शवित आहेत.
गुगलने एक GIF तयार केले
केरळची कलाकार नीतीने हे डूडल तयार केले आहे, ज्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरे करताना दाखवण्यात आले आहे. या खास प्रसंगी गुगलने एक GIF तयार केले आहे. स्वातंत्र्य दिन 2022 च्या डूडलमध्ये पतंगांच्या माध्यमातून भारताच्या संस्कृतीचे चित्रण करण्यात आले आहे. हे Google डूडल 75 वर्षातील भारताच्या महान उंचीचे प्रतीक आहे.
पतंग उडवणे ही एक जुनी परंपरा
डूडलबद्दल तिचे विचार शेअर करताना, कलाकार नीती म्हणाली की, पतंग उडवणे ही एक जुनी परंपरा आहे. ही परंपरा देखील भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. नीती म्हणाली की, स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यसैनिक ब्रिटीश राजवटीविरुद्ध घोषणा लिहिण्यासाठी पतंगाचा वापर केला जात असे. निषेधाचे चिन्ह म्हणून ते आकाशात उडवले जात असे.
Google ने बनवला 2 मिनिटांचा व्हिडिओ
यापूर्वी गुगलने आपल्या वेबसाइटवर भारत की उडान नावाचे डिजिटल पेज लाईव्ह केले होते. गुगल आर्ट अँड कल्चरच्या पेजवर तुम्ही पाहू शकता. गुगलने यासाठी एक नवीन वेबसाइट तयार केली आहे, ज्याचे नाव आहे गुगल आर्ट अँड कल्चर. या वेबसाईटवर महात्मा गांधी, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह सर्व नेत्यांची प्रतिमा दाखवण्यात आली आहे. गुगलने 2 मिनिटांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचा 75 वर्षांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला गेल्या 75 वर्षांचा भारतीय इतिहास केवळ 2 मिनिटांत दिसणार आहे.
संबंधित बातम्या
Independence Day 2022 :...आणि भारत देश स्वतंत्र झाला; 75 व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त जाणून घ्या स्वातंत्र्य दिनाचा इतिहास
Independence Day 2022 : स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साह! आज पंतप्रधानांचे देशवासियांना संबोधन, तर मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी करणार ध्वजवंदन
महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, राज्याला 84 पोलीस पदकं