रायपूर (छत्तीसगड): दोन खोल्यांचं घर त्यामध्ये दोन बल्ब आणि दोन पंखे याचं वीज बिल तब्बल 75 कोटी रुपये? हो हे खरं आहे. एका कामगार महिलेला तब्बल 75 कोटी रुपयांचं वीज बिल धाडण्यात आलं आहे. हे बिल पाहताचा सरिता यादव या महिलेला धक्काच बसला. संपूर्ण आयुष्यात आपण एवढी वीज कधीच वापरलेली नसताना अचानक ऐवढं बील आलं कुठून? असा प्रश्नही तिला पडला.


एका पत्रकारानं जेव्हा याप्रकरणी छत्तीसगडच्या राज्य वीज वितरण कंपनीच्या संचालकाला याविषयी विचारलं तेव्हा त्यानं याबाबत खुलासा केला. 'हे नजरचुकीनं झालं आहे. तुम्ही मला या बिलासंबंधी माहिती द्या, मी ते दुरुस्त करुन घेईन.'

फोटो सौजन्य: IANS / आयएएनएस

आतापर्यंत अनेकदा अशा घटना झाल्या आहेत. आता अशीच घटना छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात घडली आहे.

हे बिल पाहताच सरिता यादवला धक्काच बसला. याप्रकरणी तिने वीज वितरण कार्यालयात जाऊन वीज बिल दुरुस्त करुन देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे लवकरच तिला हे बिल दुरुस्त करुन मिळेलही पण या निमित्तानं वीज वितरण व्यवस्थेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.