Indian Students Facing Problem In Canada : कॅनडामधील (Canada) 700 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांची (Indian Students) व्हिसा एंजटकडून फसवणूक (Canada Visa Fraud) झाल्याने त्यांना आता पुन्हा मायदेशी परतावं लागणार आहे. लाखो रुपये खर्च करुन कॅनडाला गेलेल्या विद्यार्थ्यांची एजंटकडून फसवणूक झाल्याने त्यांना आता कॅनडातून भारतात परतावं लागणार आहे. या 700 विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या एजंटनी त्यांना बनावट व्हिसा देऊन कॅनडाला पाठवले होते. परिणामी आता या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे.


कॅनडा 700 भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत पाठवणार


कॅनडामधील 700 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांचं 'ॲडमिशन ऑफर लेटर' बनावट असल्याचे आढळल्याने येथील अधिकाऱ्यांकडून आता या विद्यार्थ्यांना पुन्हा भारतात माघारी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. लाखो रुपये खर्च करुन या 700 विद्यार्थ्यांना कॅनडाच्या व्हिसासाठी अर्ज केला होता. मात्र कॅनडामध्ये गेल्यावर त्यांना कळलं की, त्याचं ॲडमिशन ऑफर लेटर बनावट आहे. हे कळल्यावर या विद्यार्थ्यांना धक्काच बसला. या विद्यार्थ्यांना नुकतीच कॅनेडियन बॉर्डर सिक्युरिटी एजन्सी (CBSA) कडून निर्वासन पत्रं म्हणजे मायदेशी परतण्याचा आदेश मिळाला आहे.


एजंटकडून फसवणूक झाल्याने भविष्य टांगणीला


जालंधर येथील एज्युकेशन मायग्रेशन सर्व्हिस सेंटरमध्ये या 700 विद्यार्थ्यांनी कॅनडाच्या व्हिसासाठी अर्ज केला होता. ब्रिजेश मिश्रा नावाचा व्यक्ती यांचा एजंट होता. या एजंटने विद्यार्थ्यांना कॅनडाच्या प्रसिद्ध हंबर कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचं सांगत प्रवेश शुल्कासह सर्व खर्चासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 20 लाख रुपये घेतले होते. यामध्ये विमान तिकीट आणि त्याच्या सुरक्षेसाठीची रक्कमही आकारण्यात आली होती.


एजंटने प्रत्येक विद्यार्थ्याकडून उकळले 20 लाख रुपये


मीडिया रिपोर्ट्सनुसार, या 700 विद्यार्थ्यांनी जालंधर येथील एज्युकेशन मायग्रेशन सर्व्हिसद्वारे स्टडी व्हिसासाठी अर्ज केला होता. एजंटने प्रवेश शुल्कासह सर्व खर्चासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 20 लाख रुपये घेतले होते. एज्युकेशन मायग्रेशन सर्व्हिसने हंबर कॉलेजच्या प्रवेश शुल्क आणि सर्व खर्चासह प्रत्येक विद्यार्थी 16 लाख रुपयांहून अधिक घेतले होते. यामध्ये हवाई तिकीट आणि सुरक्षेसाठी जमा केलेल्या रकमेचा समावेश नाही. विमान तिकीट आणि त्याच्या सुरक्षेसाठी वेगळी रक्कमही आकारण्यात आली होती.


2018-19 मध्ये शिक्षणासाठी कॅनडाला गेले विद्यार्थी


हे सर्व विद्यार्थी 2018-19 मध्ये कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेले होते. या विद्यार्थ्यांनी कॅनडामध्ये परमनंट रेसिडेन्सीसाठी (PR) अर्ज केला तेव्हा ही फसवणूक उघडकीस आली. यावेळी 'एज्युकेशन ऑफर लेटर्स' तपासणी करण्यात आली. यामध्ये इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना कोणत्या कागदपत्रांच्या आधारे व्हिसा जारी केला याची तपासणी केली गेली. इमिग्रेशन अधिकार्‍यांनी प्रक्रियेदरम्यान महाविद्यालयाच्या प्रवेशपत्रांची सत्यता तपासली आणि ते प्रवेशपत्र बनावट असल्याचं आढळलं.


बहुतेक विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण


तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झालं आहे आणि त्यांनी वर्क परमिट मिळवलं आहे. तसेच त्यांनी कामाचा अनुभव देखील मिळवला आहे. पीआरसाठी (Permanent Residency) अर्ज केला तेव्हा ही फसवणूक उघडकीस आली. ही शैक्षणिक फसवणूक ही अशा प्रकारची घटना कॅनडामध्ये पहिल्यांदाच समोर आली आहे. कॅनडामधील अर्जदारांची संख्या मोठी असल्यामुळे एवढी मोठी फसवणूक झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


US Visa Law : भारतीयांसाठी जॉब व्हिसा मिळणं होणार सोपं, अमेरिकेत कायदा बदलण्यासाठी विधेयक सादर