US Employment Based Visas : भारतीयांसाठी अमेरिकेतील जॉब व्हिसा (Visa) मिळणं सोपं होण्याची शक्यता आहे. सध्या व्हिसा कायद्यात बदल करण्यासाठी अमेरिकन संसदेत नवीन कायदा विधेयक सादर करण्यात आलं आहे. अमेरिकेमधील (America) सध्याच्या फेडरल इमिग्रेशन कायद्यानुसार (Federal Immigration Law) दरवर्षी व्यवसाय किंवा नोकरीसाठी व्हिसा मंजूर केला जातो. त्याचा योग्य वापर व्हावा यासाठी शुक्रवारी (10 मार्च) यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये म्हणजे अमेरिकन संसदेच्या खालच्या सभगृहात द्विपक्षीय विधेयक मांडण्यात आलं आहे. अहवालानुसार, डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राजा कृष्णमूर्ती आणि GOP चे लॅरी बुशॉन यांनी द्विपक्षीय विधेयक सादर केलं आहे.


व्हिसाची संख्या मर्यादित


डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, आपल्या देशात हाय स्किल्ड इमिग्रेशन सिस्टम आहे. यामुळे जगभरातील उत्कृष्ट आणि कुशल कर्मचारी वर्गाला येथे येण्यास मदत होते. सध्याचा कायद्यानुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ देशाच्या आधारावर रोजगार-आधारित व्हिसा देण्याची संख्या मर्यादित आहे. म्हणजे अमेरिकन नोकरीसाठीचा अमेरिकन व्हिसा मिळणाऱ्यांची संख्या प्रत्येक देशानुसार, वेगवेगळी आहे. यानुसार, काही देशांना जास्त व्हिसा तर काहींना कमी व्हिसाची परवानगी दिली जाते. नवीन कायद्याचा उद्देश अमेरिकन अर्थव्यवस्थेला बळकट करणं हा आहे, यामुळे नोकरीच्या अधिक संधी निर्माण होण्यास मदत होऊ शकते. 


जगभरातील कुशल कामगारांना आकर्षित करण्यासाठी व्हिसाचा वापर सुनिश्चित करणं आवश्यक असल्याचं या नव्याने सादर केलेल्या विधेयकात सांगण्यात आलं आहे. असं करण्यासाठी, हाय स्किल्ड इमिग्रेशन सिस्टममधील विविध देशांनुसार त्यांच्या व्हिसाच्या संख्येत असलेली तफावत म्हणजे भेदभाव दूर करणं आवश्यक आहे. दुसरीकडे, जर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले तर भारतीयांना याचा मोठा फायदा होईल कारण. दरवर्षी भारतातून लाखो लोक अमेरिकेत नोकरी करण्याच्या व्हिसासाठी अर्ज करतात.


दरवर्षी व्हिसासाठी अनेक अर्ज


लॅरी बुचशॉन म्हणाले की, सध्याच्या फेडरल इमिग्रेशन कायद्यानुसार डॉक्टर आणि इंजिनिअरसाठी वार्षिक व्हिसा दिला जातो. हे सर्व लोक अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी मोलाचं योगदान देऊन मागण्या पूर्ण करतात. परंतु दुर्दैवाने वेगवेगळी धोरणे आणि विलंबामुळे देशभरात अधिक कुशल कामगारांची जास्त गरज असूनही हजारो लोकांना व्हिसा मिळत नाही. त्यामुळे हे विधेयक मंजूर झाल्यास व्हिसा मिळून रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध होतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


अमेरिकेत बँकिंग संकट, सिलिकॉन व्हॅली बँक बंद, सर्व मालमत्ता जप्त; एकाच दिवसात शेअर्समध्ये 70 टक्क्यांची घसरण