श्रीनगर : देशभरात लोक नोटा मोजण्यात व्यस्त असताना, तिकडे सीमेवर भारतीय जवानांनी धमाका केला. जवानांनी पाकिस्तानच्या एक-दोन नव्हे तर सात जवानांना टिपून मारलं आहे.

पाकिस्ताननेही त्यांचे सात जवान गेल्याचं मान्य केलं आहे. मात्र आता त्यांनी गरळ ओकत भारताने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा कांगावा सुरु केला आहे.

मात्र गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानने स्वत:च शस्त्रसंधीचं शेकडोवेळा उल्लंघन केलं आहे. पण पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनीही तितक्याच ताकदीने उत्तर दिलं आहे.

पाकिस्तानी मीडियाच्या मते, पाकिस्तानचे सात जवान मारले गेले आहेत. पाकिस्तानी एजन्सी आयएसपीआरने हे वृत्त दिलं आहे.  मात्र हे वृत्त देताना भारताने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची पुष्टी पाक मीडियाने जोडली आहे.

भारताने सप्टेंबर महिन्यात सर्जिकल स्ट्राईक करुन, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकने सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाककडून सातत्याने होणाऱ्या गोळीबारात भारताचे अनेक जवान शहीद झाले आहेत. मात्र भारतीय जवानही चोख कामगिरी करत, त्याचा बदला घेत आहेत.

संबंधित बातम्या

मोदीजी,'एक दिवस सूट द्या, पाकिस्तानवर तिरंगा फडकवतो'

पाकच्या गोळीबारात कोल्हापूरचे सुपुत्र राजेंद्र तुपारेंना वीरमरण

स्पेशल रिपोर्ट: शौर्याची मशाल पेटवून 'तो' गेला!


शहीद राजेंद्र तुपारे अनंतात विलीन