श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : सैन्य दिनाच्या मुहूर्तावर भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यालाही दणका दिला आहे. आज केलेल्या कारवाईत पाक सैन्यातील 7 जवानांना कंठस्नान घातले, तर 4 जवान जखमी झाले.
पाकमधील कोटली सेक्टर येथे भारतीय सैन्याने ही कारवाई केली. भारतीय सैन्यानं शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
दुसरीकडे, जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. स्थानिक पोलीस आणि लष्करानं ही संयुक्त कारवाई केलीय. खात्मा केलेले दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेतील होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
भारताविरोधातील कोणतीही कारवाई सहन करणार नसल्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी ठणकावले. शिवाय, पाकिस्तान पुरस्कृत दहशवादाविरोधाही ते अत्यंत कठोर शब्दात बोलले.
रावत म्हणाले, “जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या मार्गाने भारतात दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी जवान सातत्याने मदत करत आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही आमच्या ताकदीचा वापर करत आहोत.”
रावत पुढे म्हणाले, “जर आम्हाला भाग पाडलं तर सैन्य आक्रमक करण्यासोबतच आम्ही दुसऱ्या पर्यायांचीही मदत घेऊ शकतो.”
सैन्यदिनी हिसका, पाकच्या 7 सैनिकांना कंठस्नान, 6 दहशतवाद्यांचा खात्मा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jan 2018 02:53 PM (IST)
भारताविरोधातील कोणतीही कारवाई सहन करणार नसल्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी ठणकावले. शिवाय, पाकिस्तान पुरस्कृत दहशवादाविरोधाही ते अत्यंत कठोर शब्दात बोलले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -