झाकीर नाईकच्या खात्यावर परदेशातून 60 कोटी
एबीपी माझा वेब टीम | 11 Aug 2016 07:33 AM (IST)
मुंबईः इस्लामचा धर्मप्रसारक झाकीर नाईकच्या बँक खात्यावर गेल्या तीन वर्षात परदेशातून 60 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली. नाईकच्या कुटुंबातील 5 सदस्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. पोलिसांनी नाईकच्या देवाणघेवाणीबद्दल तपास केला असता ही बाब उघड झाली. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा अहवाल पोलिसांनी नुकताच मुख्यमंत्र्यांना दिला आहे. सर्व पैसे वैयक्तिक खात्यांवर जमा परदेशातून खात्यात पाठवण्यात आलेले पैसे हे झाकीर नाईकच्या संस्थेच्या नावावर नव्हे, तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले आहेत. नाईकच्या खात्यावर जमा झालेला पैसा परदेशी योगदान अधिनियम कायद्यांतर्गत जमा झाला आहे का, याबाबत चौकशी करण्याचा निर्णय पोलिस घेणार आहेत. नाईकच्या संस्थांची शैक्षणिक संस्था म्हणून नोंदणी आहे. मात्र परदेशातून जमा झालेला निधी धार्मिक कारणांसाठी होता का, याचा तपास केंद्रीय गृह मंत्रालय करत आहे.